शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पीएम किसान योजनेपासून वंचित, गावात तिरडीचे मडके पाहून…

| Updated on: Jul 10, 2023 | 9:42 AM

PM KISAN YOJAYA : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शासकीय कर्मचाऱ्यांमुळे मोठी अडचण झाली आहे. जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा त्यांना लाभ घेता येत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पीएम किसान योजनेपासून वंचित, गावात तिरडीचे मडके पाहून...
Buldhana news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM KISAN YOJAYA) अंतर्गत जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखवून शासनाच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठी घोडचूक केली असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले आहेत. आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना (FARMER NEWS) पडला आहे. मागच्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. परंतु अद्याप त्यावर कसलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेला लाभ घेता येत नाही. मागच्या वर्षभरात काहीचं न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी (BULDHANA NEWS) गावात तिरडी मोर्चा काढला होता.

शासनाच्या विरोधात मोर्चा

मागच्या वर्षभरापासून शेलोडी येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासन शासनाकडे चूक दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले. परंतु त्याचा अद्याप कसलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे शेलोडीतील शेतकऱ्यांची जशी अडचण झाली आहे. तसा इतरही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते राम डहाके यांच्या नेतृत्वात शेलोडी येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकरी एवढ्यावर थांबले…

शेतकरी एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी शासनाच्या विरोधात तिरडी आंदोलन केलं. गावात तिरडीचे मडके पाहून यावेळी शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. समजा यानंतर सुध्दा शासनाने या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर आम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी राम डहाके यांनी दिला.

पीएम किसान योजनेचा देशातील अनेक शेतकरी लाभ घेत आहेत.  वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा होतात. हे पैसे तीन टप्प्यात जमा होतात. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.