बीड : (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादन तर वाढवलं मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य (Market) बाजारपेठही मिळणे तेवढेच महत्वाचे आहे. शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्याचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांनाही नाही. मात्र, काळाच्या ओघात शेतकरीही कमर्शियल होत आहे. अधिकच्या फायदा मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यातीलच नागरिकांना फळांची चव चाखता यावी यासाठी (Beed District) बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकऱ्याने भन्नाट आयडीया केली आहे.उन्हाळ्याला सुरवात होताच टरबूज, खरबूजाच्या मागणीत वाढ झाली असून या शेतकऱ्याने शेतासमोरच फळविक्री केंद्र सुरु केले आहे. ना वाहतूकीचा खर्च ना कवडीमोल दर. ग्राहकांना परवडेल आणि स्वत:चा खर्च निघेल या उद्देशाने सुरु केलेल्या फळविक्री केंद्राला चांगला प्रतिसादहीम मिळत आहे.
सेंद्रीय शेतीकडे दुर्लक्ष असले तरी या पध्दतीने घेतलेल्या उत्पादनाला अधिकची मागणी आहे. यामुले वाटणवाडी येथील हनुमंत जाधव यांनी टरबूज आणि खरबूजाची सेंद्रीय पध्दतीने लागवड केली होती. रासायनिक खताचा वापरच केला नाही. त्यामुळे या केंद्रावरील फळांना अधिकची मागणी आहे. शिवाय थेट शेतकऱ्यांकडून फळे मिळत असल्याने व्यापाऱ्यांपेक्षा स्वस्त असणार ही ग्राहकांची भावना झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने केलेल्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सध्या उन्हाच्या झळा वाढत आहे. त्यामुळे कलिंगड आणि खरबूजाच्या मागणीत वाढ होत आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना मार्केट जवळ करता आले नाही यंदा मात्र शेतकऱ्याने शेताजवळच मार्केट निर्माण केले आहे. शिवाय शुगर किंग आशा वाणाच्या कलिंगडला 10 रुपये किलो असा दर आहे. शिवाय शेतकरी स्वत:च विक्री करीत असल्याने यामध्ये कमी-अधिक करुनही फळविक्री सुरु झाली आहे.
शेतकरी हनुमंत जाधव यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांच्याही उत्पन्नात वाढ झाली शिवाय ग्राहकांनाही अस्सल गावरान फळे चाखायला मिळत आहेत. शिवाय व्यापाऱ्यांची मध्यस्ती बाजूला सारली गेल्याने योग्य दरात ही फळे मिळत आहेत. जाधव हे इतर शेतकऱ्यांकडून फळे घेऊनही विक्री करीत आहेत. बीड तसा दुष्काळी जिल्हा पण उत्पादन वाढीसाठी केलेल्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांनो चिंता सोडा कामाला लागा, पंजाब डख यांचा पावसाविषयी काय आहे अंदाज?