Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!

| Updated on: Apr 13, 2022 | 4:32 PM

मुख्य पिकांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तर द्राक्षाचे उत्पादन तर घटले आहेच पण आहे त्या बागा देखील मोडाव्यात अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. असे असताना वेगळा पर्याय निवडल्यावर काय होऊ शकते हे एका महिला शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!
यंदा मुख्य पिकांपेक्षा हंगामी पिकातून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. कलिंगडला विक्रमी दर मिळत आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लासलगाव : मुख्य पिकांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तर (Grape Production) द्राक्षाचे उत्पादन तर घटले आहेच पण आहे त्या बागा देखील मोडाव्यात अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. असे असताना वेगळा पर्याय निवडल्यावर काय होऊ शकते हे एका महिला शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. मुख्य पिकातून अधिकचे उत्पादन मिळवण्याच्या भानगडीत न पडता कोटमगाव येथील (Women Farmer) महिला शेतकरी सोनाली कोटमे यांनी (Watermelon) कलिंगड या हंगामी पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्याचा निर्धार केला होता. तो आता यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे. कारण कलिंगडचे उत्पादनही वाढले आणि आता दरही वाढीव मिळत आहे. अडीच एकरातून लाखोंचे उत्पन्न त्यांच्या पदरी पडलेले आहे.

3 एकरामध्ये कलिंगडची लागवड

हंगामी पीके ही बेभरवश्याची असतात असे मानले जाते. पण योग्य नियोजन आणि बाजारभावाचा अभ्यास करुन उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले तर हेच हंगामी पीक मुख्य पिकांपेक्षा अधिकचे उत्पन्न देते. रमजानच्या पवित्र महिन्यात कलिंगडला अधिकची मागणी असते याचाच अभ्यास करुन सोनाली कोटमे यांनी तब्बल 3 एकरामध्ये कलिंगडची लागवड केली होती. लागवडीपासून पाण्याचे नियोजन आणि बदलत्या वातावरणात कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषध फवारणी. या दोनच बाबींवर लक्ष केंद्रीत केले होते. यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये कलिंगडचे पीक तोडणीला आले होते.

उत्पादन खर्च वगळता लाखोंचा फायदा

सोनाली कोटमे यांनी तीन एकर मध्ये कलिंगडचे पीक घेतले होते. दोन महिने पीक जोपासत असताना त्यांना अडीच लाखाच्या आसपास खर्च आला. पहिल्याच कलिंगडच्या तोड्यामध्ये साडेतीन लाख रुपये झाल्याने या महिलेचा उत्पादन खर्च निघून लाख रुपये वरती नफा मिळाला आहे. अजूनही एक तोडा होणार आहे. दोन ते अडीच लाख रुपये अजूनही मिळतील अशी अपेक्षा या महिलेला आहे .नक्कीच शेतकऱ्याने देखील टरबूज पीक घेतल्यास कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळेल असे आव्हान या महिलेने शेतकऱ्यांना केले आहे.

प्रयत्नाला मिळाली वाढीव दराची जोड

महिला शेतकऱ्याचे प्रयत्न आणि कलिंगडचे वाढते दर या दोन्ही गोष्टी साधून आल्याने कष्टाचे चीज झाले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे कलिंगडला मार्केटच नव्हतं. यंदाही तिसऱ्या लाटेबाबत संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे अनेकांनी लागवडच केली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी लागवड करण्याचे धाडस केले. आता कलिंगडला 15 ते 16 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांनाच मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?

Photo Gallery : आंबेगावच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीमध्ये विसावा घेत आहे बैलजोडी

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?