गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी येथे दादाजी फुंडे यांनी आपल्या गावातच शेती (agricultural) व्यवसायात (business) झोकून देऊन विविध प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीला (Traditional farming) बगल देत नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करून लाखोंचे उत्पन्न घेण्याचे कसब दादा फुंडे यांनी आत्मसात केले आहे. धानाच्या शेतीला फाटा देत आपल्या आवडत्या पिकांचे उत्पादन घेऊन शंभरावर मजूरांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
ब्राह्मणटोला या खेडेगावातील असलेल्या दादा फुंडे यांनी 1980 पासून शेती व्यवसायाला सुरूवात केली. बारमाही पाण्याची बारमाही शेती करण्याचा ठाम निश्चय केला. एका वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा संकल्प करून 13 एकर शेती खैरी येथे खरेदी केली. त्यानंतर 2005 साली शेतीभोवतीने तारांचे कुंपण तयार केले. त्यावेळी त्या जमिनीवर साधे गवतसुद्धा उगवत नसताना या जमिनीचे भौगोलिक अवलोकन करुन एक विहीर आणि चार बोअरवेल खोदून शेती ओलिताखाली आणली. शेतीत जलसिंचनाची व्यवस्था केली. त्यावेळी आंबा,सागवान झाडे लावली, तर सोबत देशी गायी पालन करीत रब्बी पिके हरभरा, तूळ, तीर, येरंडी, सुर्यफूल, मक्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
जमिनीच्या सखल उंच भागानुसार 23 प्लॉट तयार करून चार एकर जागेत शेडनेट तयार केले. त्यानंतर त्यांनी पारंपरिक आंतर पिके घेत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले तर पांढऱ्या चंदनाची शेतीही केली. त्यांच्या या शेतीच्या प्रयोगामुळे शंभरावर मजूरांना रोजगार मिळाला आहे. एकंदरीत पारंपारिक धान शेतीला त्यांनी फाटा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवा संदेश दिला आहे.
गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र पारंपरिक धान शेतीला फाटा देत दादा फुंडे यांनी बारमाही शंभरावर सेंद्रिय पिकांचे उत्पादन आपल्या शेतात घेत लाखो रूपये ते मिळवितात. मात्र इतरही शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करावे अशी प्रेरणाही इतर शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे धानाच्या पट्ट्यात आता शेतकरी बागायती शेतीकडे वळू लागली आहेत. यांच्या प्रयोगशील आणि नाविण्यपूर्ण शेती त्यांच्या पत्नीचासुद्धा मोलाची साथ आहे.
जर प्रत्येक शेतकरी धानाच्या शेतीसोबत नगदी पिकांकडे वळले तर नक्कीच त्यांचीसुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा संदेशच दादा फुंडे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या