तोटा झाला तरी चालेल, क्वालिटीशी तडजोड नाही; खराब आंब्याची निर्यात नाही, पुण्याच्या शेतकऱ्याचा निर्णय

| Updated on: May 10, 2021 | 3:21 PM

कोरोना संसर्गाचा फटका बसत असताना अवकाळी पावसानं हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. alphonso farmer Nitin Kale

तोटा झाला तरी चालेल, क्वालिटीशी तडजोड नाही; खराब आंब्याची निर्यात नाही, पुण्याच्या शेतकऱ्याचा निर्णय
Nitin Kale
Follow us on

पुणे: हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढत आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे हापूस उत्पादक शेतकरी संकटात आला. यंदाही कोरोना संसर्गाचा फटका बसत असताना अवकाळी पावसानं हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात गारपीट झाली होती. त्यामुळे जवळपास 60 ते 70 टक्के हापूस आंबा खराब झाला आहे. यामुळे पुण्यातील शेतकऱ्यांनी आंबा निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हापूस आंब्याची गुणवत्ता आणि भारतीय हापूस बद्दलचा परदेशातील लोकांचा विश्वास कमी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. कोरोना महामारीचा फायदा घेत अनेकजण गैर मार्गानं पैसे कमवत आहेत, अशावेळी पुण्याच्या शेतकऱ्यांचा निर्णय आदर्शवत आहे. (Pune based alphonso farmer Nitin Kale said Trust not broken Therefore he will not export Alphonso mangoes)

चांगल्या प्रतीचा हापूस निर्यात करु

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेतकरी नितीन काळे यांनी यंदा आंब्याला बहर कमी आला होता. त्यामुळे आंब्याचं उत्पादन कमी आहे. जो चांगल्या प्रतीचा आंबा आहे तोच निर्यात केला जाईल, असं नितीन काळे या शेतकऱ्यानं सांगितलं आहे. यावर्षी हापूसला चांगला दर मिळेल असा अंदाज होता. मात्र, 20 दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटीमुळे हापूस आंब्याचं नुकसान झालं. आता फक्त चांगल्या प्रतीचा आंबा निर्यात केला जाईल, असं नितीन काळे म्हणाले.

किती फायदा व्हायचा

नितीन काळे यांची 15 एकर क्षेत्रावर आंब्याची बाग आहे. त्यामध्ये हापूस आंब्याची एकूण 750 झाडं आहेत. त्यामधून काळे यांना 20 लाख रुपयांचं उत्पन्न व्हायचं. त्यामधून त्यांना 14 लाखांचा नफा व्हायचा. यावर्षी आंबा फळ खराब झालं आहे. दर देखील पडल्यानं त्यांचं उत्पन्न कमी होणार आहे.

हापूसचे दर उतरले

साधारणपणे हापूस आंबा एका डझनला 1 हजार ते 1200 रुपयांना विकला जातो. मात्र, यावर्षी हापूस आंबा 400 ते 500 रुपयांना डझन विकला जात आहे.

हापूसला अल्फांन्सो नाव कसं मिळालं?

हापूस आंब्याला इंग्रजीमध्ये अल्फांसो म्हटलं जातं. अल्फांन्सो नाव कसा मिळालं याचा इतिहास देखील गमतीशीर आहे. अल्फांन्सो नाव पोर्तुगीज युद्ध रणनीतीकार अफोंसो अल्बूकर्क याच्या नावावरुन पडलं आहे. अफोंसो दि अल्बूकर्कला बागा लावण्याचा छंद होता. गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीजांचं राज्य होतं त्यावेळी त्यानं आंब्यांची झाडं लावली होती. इंग्रजांना हे काम आवडलं होतं. अखेर अफोंसो दि अल्बूकर्क याच्या स्मरणार्थ अल्फान्सो हे नाव ठेवण्यात आलं आजही युरोपामध्ये अल्फान्सो म्हणजेच हापूस प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या:

हापूस आंब्याला सर्वाधिक दर का मिळतो? हापूसला इंग्रजी नाव अल्फान्सो कसं मिळालं?

हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम

सांगलीत मुहूर्ताच्या आंब्याचे आतषबाजीने स्वागत, रत्नागिरीच्या हापूस पेटीला मिळाले….

(Pune based alphonso farmer Nitin Kale said Trust not broken Therefore he will not export Alphonso mangoes)