Lasalgaon Onion: 2 दिवसांमध्येच ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह, कांदा उत्पादक संघटनेची नेमकी भूमिका काय?

| Updated on: Apr 18, 2022 | 3:40 PM

दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीमध्ये नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदीला सुरवात झाली आहे. दरवर्षी ही प्रक्रिया पार पडत असून यंदा मात्र, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने या कांदा खरेदीला घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कांदा दराचा लहरीपणा हा सर्वानाच माहिती आहे. शिवाय निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. असे असताना सध्या कांद्याला 7 ते 9 रुपये किलो असा दर मिळत आहे.

Lasalgaon Onion: 2 दिवसांमध्येच नाफेडच्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह, कांदा उत्पादक संघटनेची नेमकी भूमिका काय?
गेल्या दोन दिवसांपासून लासलगाव मार्केटमध्ये कांदा खरेदीला सुरवात झाली आहे पण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून त्यास विरोध होत आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लासलगाव : दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीमध्ये (NAFED) नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदीला सुरवात झाली आहे. दरवर्षी ही प्रक्रिया पार पडत असून यंदा मात्र, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने या (Onion Buy ) कांदा खरेदीला घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Onion Rate) कांदा दराचा लहरीपणा हा सर्वानाच माहिती आहे. शिवाय निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. असे असताना सध्या कांद्याला 7 ते 9 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादन आणि दराबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेऊ शकत नाही तर येथील बाजारसमितीमधून नाफेडलाही कांदा खरेदीचा अधिकार नाही. कांदा उत्पादक संघटनेच्या मागण्यांना जर किंमतच नसेल तर मग नाफेडचीही कांदा खरेदी बंद पाडू असा इशाराच उत्पादक संघटनेने दिला आहे. त्यामुळे भविष्यात काय होतय ते पहावे लागणार आहे.

कांदा उत्पादक संघटनेच्या मागण्या काय?

कांद्याचे दर हे आवकवर अवलंबून आहेत. कांदा दराच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. शिवाय या नगदी पिकाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असातना कांदा दराचे धोरण ठरवले तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, कांदा उत्पादक संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कांद्याचे दर हे रात्रीतून वाढतात अन्यथा कवडीमोल होतात. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे कांद्याचा निचांकी दर ठरवावा किंवा 30 रुपये किलो प्रमाणे हमीभाव द्यावा अशी मागणी संघटनेची आहे.

अन्यथा खरेदी बंद..

सरकारडून नाफेडच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीला सुरवात झाली आहे. यामध्ये थोड्याभोवत प्रमाणात दर वाढले असले तरी त्यामधून उत्पादनाचा खर्चही निघणार अशी अवस्था आहे. 11रुपये किलो याप्रमाणे नाफेडने कांद्याची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 30 रुपये किलो असा दर मिळाला तरच हे पीक शेतकऱ्यांना परवडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीसोबतच लवकरच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या अंतर्गत नाफेडकडून खरेदी करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला जोपर्यंत 30 रुपये प्रति किलो दर मिळत नाही तोपर्यंत नाफेडची कांदा खरेदी बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून खरेदीला सुरवात

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे. भविष्यात कांदा दरात विक्रमी वाढ झाली तर त्या दरम्यान दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राकडून कांद्याची साठवणूक केली जात आहे. 16 एप्रिल पासून खरेदीला सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे बाजारपेठ आणि नाफेडमध्ये कांदा खरेदीची स्पर्धा लागली तर कांदा उत्पादकांना फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीनचे स्थिरच, हरभऱ्याच्या दरवाढीमागे कारण काय? शेतकऱ्यांची सावध भूमिका

Agricultural Department : खरिपाच्या नियोजन बैठकांमध्येही ‘पिन होल बोरर’वरच चर्चा, डाळिंब बागा जोपासण्याचे आव्हान

Sangli : द्राक्षाचे तेच बेदाण्याचे, शेतकऱ्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाच, सर्वकाही व्यर्थ

https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos