रब्बी हंगाम : रात्री अखंडीत अन् दिवसा अनियमित विद्युत पुरवठा, सांगा शेती करायची कशी?

| Updated on: Feb 18, 2022 | 1:36 PM

पिके जोमात असताना आता गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढलेला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. सध्या कृषी पंपासाठी केवळ सात तास विद्युत पुरवठा आणि तोही रात्रीच्या दरम्यान केला जात आहे.

रब्बी हंगाम : रात्री अखंडीत अन् दिवसा अनियमित विद्युत पुरवठा, सांगा शेती करायची कशी?
कृषीपंप
Follow us on

धुळे : रब्बी हंगामातील पिकांसाठी वातावरण पोषक आहे. शिवाय यंदा मूबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने सर्वकाही सुरळीत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात बांधावरची स्थिती काही वेगळीच आहे. खरीपात झालेले नुकसान  (Rabbi Season) रब्बीत भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. पिके जोमात असताना आता गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढलेला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळाले तरच (Increase Production) उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, सुरळीत (Supply Power) विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. सध्या कृषी पंपासाठी केवळ सात तास विद्युत पुरवठा आणि तोही रात्रीच्या दरम्यान केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिश्रमात दुप्पट वाढ झाली आहे. कृषीपंपासाठी सात तासच पण दिवसा आणि तोही नियमित विद्युत पुरवठा कऱण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमावर बोट ठेवत असा पुरवठा शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.

रब्बी हंगामातील पिके जोमात

मध्यंतरीचा निसर्गाचा लहरीपणा सोडला तर रब्बी हंगामातील पिके ही जोमात आहेत. सकाळी गारवा आणि दुपारचे ऊन यामुळे पिकांची वाढ वेगाने होत असली तरी उत्पादन वाढीसाठी पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, दिवसा आठवडा असताना सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही तर रात्री सुरळीत पुरवठा होत असला तरी गारठ्यामुळे पिकांना पाणी देणे मुश्किल होत आहे. आता पिके फुलोऱ्यात आणि शेंगा, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यात बदल झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.

क्षमतेपेक्षा अधिकचे राहित्र ट्रान्सफार्मरवर

सध्या भरण्याचे दिवस आहेत आहेत. विद्युत पुरवठा सुरु झाला की कृषिपंपही आपोआप सुरु होतात. त्यामुळे दिवसा ट्रान्सफार्मरवर दाब निर्माण होऊन रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दिवसाच्या आठवड्यात सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने पिकांना पाणी द्यावे कसे हा प्रश्न आहे. शेतामध्ये पाण्याच्या नियोजन करता येत नसल्याने पीक हातातून जात आहे पिकांना पुरेसं पाणी पुरवठा होत नसल्याने ही काही जळत आहेत सेदेखील शेतकर्‍यांनी खंत व्यक्त केली आहे.

रात्री असून अडचण नसून खोळंबा

महावितरणने ठरवल्याप्रमाणे कृषीपंपाना दिवसातून केवळ 7 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. यामध्येही वेळापत्रक ठरवून देण्यात आले असून काही भागात दिवसा तर काही ठिकाणी रात्रीचा विद्युत पुरवठा केला जात आहे. यामुळे महावितरणचे नियोजन होत असले तरी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची पूरती दमछाक होत आहे. त्यामुळे योग्य तो तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या :

खुशखबर..! ‘ती’ 25 टक्के रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, काय आहे सरकारचा आदेश?

Photo : शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरातील ऊस भस्मसात

शेतकऱ्यांनो सावधान! वेळेत शेतसारा अदा करा अन्यथा सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासनाचे’ नाव, काय आहे नेमके प्रकरण?