मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ (PUNE MAVAL) तालुक्यात शिळीम्ब (SHILIMB) येथे नाचणी पीक (ragi crop) जोमात आल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात भात पिकानंतर खरीप हंगामात नाचणी हे पीक महत्वाचे आहे. पूर्वीची लोक नाचणीचा उपयोग आहारात करत होते. परंतु आता नाचणी पीकाचे क्षेत्र कमी झाले असून आहारात याचा उपयोग कमी होत आहे. कृषी विभागाने यावर्षी नाचणीच्या बियाणांचे शेतकऱ्यांना वाटप केले होते. नाचणीच्या बियाणांची पेरणी सुध्दा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामात नाचणी बियाणे किट प्रत्यक्षिकासाठी वाटप केले होते. शिळीम्ब या गावात नाचणी पिकाची लागवड करण्यात आली होती. सध्य स्थितीला नाचणीचे पीक जोमात आले आहे. नाचणी पिकाचे क्षेत्र वाढविणे, त्याचे आहारातील महत्व यासाठी कृषी विभागाच्या पुढाकाराने नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत. गावागावात नाचणी पीक क्षेत्र वाढीसाठी मावळ कृषिविभाग प्रयत्न करत आहे.
मावळ तालुक्यात सध्या वातावरणात मोठा बद्दल झालेला दिसून येत आहे. सकाळी धुके, दुपारी उष्णता आणि रात्रीचे गार वारे अशा संमिश्र वातावरणात मावळातील निसर्ग अजूनच बहरू लागला आहे. आंदर मावळात आज सकाळपासूनच धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. सकाळी कामाला जाणारे चाकरमानी तसेच शेतकरी दुग्धव्यवसायिक यांना या धुक्यातून वाट शोधत आल्हाददायक प्रवास करावा लागत होता.
यंदा राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे अनेक पीकांना त्याचा फटका बसणार आहे. त्याबरोबर खरीप हंगामातील पीकाचं उत्पन्न सुध्दा कमी होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पीकं सुकली आहेत.