सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कराड येथील सत्र न्यायालयानं ऊसदर आंदोलनातील एका खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर कराड येथील २०१३ मधील ऊस दर आंदोलन प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. दोन्ही शेतकरी नेत्यांची खटल्यातून मुक्तता केली असली तरी कार्यकर्त्यांच्यावरील खटला सुरु ठेवण्यात येणार आहे. (Raju Shetti and Sadabhau Khot released by Karad Session Court from Sugarcane Prize Protest Case)
स्वाभिमनी शेतकरी संघटनेतर्फे ऊसदर प्रश्नी 2013 मध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको, टायर जाळणे अशा प्रकारचं आंदोलन केलं होते. 2013 मध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकत्रितपणे ऊसदर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करत होते. 2013 मधील ऊसदर आंदोलनातील 47 केसेसमधून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नेत्यांची निर्दोष मुक्तता कार्यकर्त्यांवरील खटले सुरु राहणार
कराड येथे 2013 साली झालेल्या ऊसदर आंदोलनाच्या 47 केसेसेमधून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांची इतर दोन खटल्यातून दोष मुक्तता झाली आहे. मात्र, यातील इतर आंदोलकांवरील खटला सुरूच राहणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलनालवर शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीका केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्ठा चालवली होती, असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरु आहे. या आंदोलनात 55 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीसुद्धता या सरकारला जाग आली नाही, असा आरोप राजू शेट्टींनी केला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापले. यामुळे न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली नसल्याचं स्पष्ट झालं, असंही राजू शेट्टी म्हणाले. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनबाबात नाटक करत आहे. टाईमपास करत आहे, सुप्रीम कोर्टाने हे सगळं ओळखून केंद्र सरकारला चांगलेच झापले असल्याचे राजू शेट्टींना सांगितले.
Video | Raju Shetti | सर्वोच्च न्यायालयाच्या आडून कृषी कायदे लादण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींची टीका@rajushetti #FarmersProtest #SupremeCourt #ModiGovt pic.twitter.com/2shZgEazAt
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
संबंधित बातम्या :
मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने, सदाभाऊ खोतांचा आरोप
चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले
(Raju Shetti and Sadabhau Khot released by Karad Session Court from Sugarcane Prize Protest Case)