मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti )यांनी कृषी कायद्यांवरुन (Farm Laws) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही दशकांपासून हमीभावाला कायद्याचं स्वरूप द्या अशी मागणी करत आहे. पण, मोदी सरकार काळे कायदे आणून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप राजू शेट्टींनी केला आहे. (Raju Shetti criticize Narendra Modi Government over Farm Laws)
केंद्र सरकारचा हे तीन कायदे आणून शेतकऱ्यांना कार्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी संघटना दशकांपासून हमीभावाला कायद्याचं रुप द्या, अशी मागणी करत आहेत, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं टीकास्त्र राजू शेट्टींनी सोडलं आहे.
केंद्र सरकार जोपर्यंत 3 कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवलं जाणार आहे, असा इशारा राजू शेट्टींनी दिला. राज्य सरकारनं केंद्राचे कायदे लागू करण्याला स्थगिती दिली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात केंद्र सरकारचे कायदे लागू केले जातील. त्यावेळी महाराष्ट्रात दिल्ली पेक्षाही मोठं आंदोलन केले जाईल, असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. ऊस उत्पादकांच्या प्रश्नावरुनही राजू शेट्टींनी भूमिका स्पष्ट केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून काही दिवसांपूर्वी सांगली येथे एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन केलं होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलनालवर शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीका केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्ठा चालवली होती, असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरु आहे. या आंदोलनात 55 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीसुद्धता या सरकारला जाग आली नाही, असा आरोप राजू शेट्टींनी केला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापले. यामुळे न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली नसल्याचं स्पष्ट झालं, असंही राजू शेट्टी म्हणाले. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनबाबात नाटक करत आहे. टाईमपास करत आहे, सुप्रीम कोर्टाने हे सगळं ओळखून केंद्र सरकारला चांगलेच झापले असल्याचे राजू शेट्टींना सांगितले.
Video | Raju Shetti | सर्वोच्च न्यायालयाच्या आडून कृषी कायदे लादण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींची टीका@rajushetti #FarmersProtest #SupremeCourt #ModiGovt pic.twitter.com/2shZgEazAt
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
संबंधित बातम्या:
चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले
(Raju Shetti criticize Narendra Modi Government over Farm Laws)