इंदापूर : तालुक्यातील भवानीनगर येथे शेतकऱ्यांना रास्तारोको करण्यास पोलीसांनी विरोध केल्यानंतर या आंदोलकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानाकडेच आगेकूच केली होती. पोलीसांनी आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची धरपकड केली होती. पोलीसांनी रास्तारोको करण्यास विरोध केल्याने आता आपली भुमिका ही उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवास्थानसमोरच मांडणार असल्याचा इशारा देत शेतकऱ्यांनी उर्जाभवनकडे आगेकूच केली आहे. आंदोलकांच्या या भुमिकेमुळे मात्र, पोलीसांचीच चांगलीच तारांबळ उडाली.
येथील भवानीनगर येथील छत्रपती सहकारा साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडित केल्यामुळे आंदोलन सुरु होते. मात्र, या ठिकाणी निषेध नोंदवल्यानंतर आंदोलकांनी इंदापूर- बारामती या राज्यमार्गावर रास्तारोको करण्याची भुमिका घेतली मात्र, त्याला पोलीसांनी विरोध करताच आंदोलक व शेतकऱ्यांनी थेट बारामतीचाच रस्ता धरला होता.
सध्या महावितरणची विजबिल वसुली मोहीम सुरु आहे. त्या दरम्यान, काही भागातील विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोर आंदोलन केले होते. या ठिकाणी आंदोलन पार पडल्यानंतर मात्र, इंदापूर-बारामती हा राज्यमार्गावर रास्तारोको करण्याची भुमिका आंदोलकांनी घेतली होती. मात्र, याला पोलीसांनी विरोध केला. परवानगी नसताना रास्तारोका करता येणार नाही ही पोलीसांची भुमिका होती. परंतू, विरोध होताच आंदोलकांनी थेट बारामतीचाच रस्ता धरला. पायी जात उर्जाभवन येथेच आंदोलन करण्यात येणार असल्याची भुमिका आंदोलकांनी घेतली होती.
विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे सुरु असलेले आंदोलन एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहचले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोर आंदोलन केल्यानंतर काही आंदोलकांनी रास्तारोको करण्याची भुमिका घेतल्याने पोलीसांनी धरपकड करण्यास सुरवात केली. कारण रास्तारोको करण्यास परवानगी नसताना आंदोलकांनी घेतलेली भुमिका ही चुकीची असल्याचे मत पोलीसांनी व्यक्त केले आहे.