अकोला : पावसामुळे पिकांचे नुकसान झाले हे जरी खरे असले तरी सध्या (Kharif Season) खरिपातील कांद्याची आणि आता तुरीची होत असलेली आवक ही विक्रमी आहे. सध्या सोयाबीन, कांदा आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. असे असतानाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आवक झालेल्या कांद्याची विक्री आणि साठवणूक व्यवस्थित व्हावी म्हणून लिलाव बंद ठेवावे लागले होते. तर आता (Akola Market) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीलाही असाच काहीसा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या (Toor Crop) तुरीचा हंगाम सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच तुरीची आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की, मोजमाप होण्यासाठी आता दोन दिवसाचा कालावधी लागणार होता. त्यामुळे दोन दिवस तुर विक्रीला आणू नये असे आवाहान बाजार समिती प्रशासनाला करावे लागले होते. हंगामाची सुरवात असल्याने हे चित्र असल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे.
खरीप हंगामात तूर हे आंतरिपक म्हणूनच घेतले जाते. यंदा याचे प्रमाण वाढले होते. मात्र, अंतिम टप्प्यात वातावरणातील बदलामुळे तुरीवर कीडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील उत्पादनावर परिणाम झाला होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषध फवारणी केली आहे त्यांची उत्पादकता ही वाढलेली आहे. यंदा एकरी 1 क्विंटलपासून ते 6 क्विंटलपर्यंतचे उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत. शिवाय आता एकाच वेळी तुरीची काढणी आणि सर्वच कामे ही झाली आहेत. त्यामुळे केवळ अकोलाच नाही तर लातूर, अमरावती यासारख्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. शिवाय अजून 15 दिवस अशाच प्रकारे आवक राहणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात तुरीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. यंदा अधिकच्या पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात याचे प्रमाण अधिक आहे. विदर्भातील तुरीचे पीक हे चांगले आहे. मालाच्या दर्जानुसारच सध्या दरही मिळत आहेत. केवळ राज्यातच नाही कर्नाटक आणि इतर राज्यातूनही तुरीच्या मागणीत वाढ होत आहे. वाढत्या मागणीमुळे भविष्यात दरही चांगले राहणार आहेत. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे.
सध्या तुरीचा हंगाम कुठे सुरु झाला आहे. नाफेडच्या वतीन सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्राकडे शेतकरी हे पाठ फिरवत आहेत. केंद्रावरील कागदपत्रांची औपचारिकता आणि बिलासाठी होत असलेला वेळ यामुळे शेतकरी थेट खुल्या बाजारातच विक्री करीत आहेत. खुल्या बाजारात सरासरी 5 हजार 900 चा दर असला तरी काटा झाला की पेमेंट हे शेतकऱ्यांना परवडणारे आहे. त्यामुळे आवक वाढत आहे. भविष्यात हमीभावापेक्षाही अधिकच्या दराने तुरीची विक्री होऊ शकते.
कोरोना काळात शेती क्षेत्राचीच देशाला मिळाली साथ, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बळीराजा केंद्रस्थानी
Grape : द्राक्षाचे नुकसान आता बेदाणा निर्मितीच्याही वाढल्या अडचणी, काय आहेत समस्या ?