Latur Market: सोयाबीन दरात चढ-उतार असतानाही विक्रमी आवक, काय आहेत कारणे?

| Updated on: Jan 17, 2022 | 1:46 PM

जानेवारी महिन्याच्या सुरवातीला (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती. तीच वाढ कायम राहिल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, 15 दिवसानंतर पुन्हा दरात चढ-उतार पाहवयास मिळत आहे. 6 हजार 400 वर स्थिरावलेले सोयाबीन पुन्हा 6 हजार 100 वर आले आहे. तब्बल 300 रुपयांची घसरण झाली आहे.

Latur Market: सोयाबीन दरात चढ-उतार असतानाही विक्रमी आवक, काय आहेत कारणे?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली असून दर स्थिर आहेत.
Follow us on

लातूर : जानेवारी महिन्याच्या सुरवातीला (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती. तीच वाढ कायम राहिल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, 15 दिवसानंतर पुन्हा दरात चढ-उतार पाहवयास मिळत आहे. 6 हजार 400 वर स्थिरावलेले सोयाबीन पुन्हा 6 हजार 100 वर आले आहे. तब्बल 300 रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, घसरलेले दर कायम राहणार नाहीत तर यामध्ये बदल होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता दरात कमी-अधिकपणा झाला तरी आवक ही वाढतीच राहणार आहे. कारण गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांनी (Soybean Stock) सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनला देखील धोका आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीन हे जोमात आहे. त्यामुळे ते (Market) बाजारात दाखल होण्यापूर्वी शेतकऱ्यांना साठवणूकीतले सोयाबीन विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम हा थेट दरावर होणार असल्याने आता जिल्ह्यातूनच नाही परजिल्ह्यातूनही आवक सुरु झाली आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्दळ ही वाढलेली आहे.

25 हजार पोत्यांची झाली आवक

गेल्या पाच महिन्यांमध्ये झाली नाही अशी आवक सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे. दोन दिवसांच्या सुट्ट्या आणि आता वातावरणातील बदलामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीच्या हलचाली करीत आहे. तर दुसरीकडे वाढत्या कोरोनामुळे बाजार समितीमधील निर्बंध अधिकच कडक होत आहेत. या सर्व परस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांपासून साठवणूक केलेले सोयाबीन आता कुठे बाजारात येत आहे. शिवाय दरही समाधानकारक आहेत. त्यामुळे धान्य असताना त्याची नासाडी करण्यापेक्षा शेतकरी आता अधिकची वाट न पाहता विक्रीच्या तयारीत आहेत. वातारणातील बदलामुळेच आवक वाढली असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले आहे.

काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. मध्यंतरी दर घटले असताना शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला होता. त्यामुळे बाजारात आवक ही नियंत्रणात राहिली आणि त्याचबरोबर दरही. त्याचा फायदा आता झाला असून जवळपास 2 हजार रुपायंनी सोयाबीनचे दर हे वाढलेले आहेत. सोयाबीनला 8 ते 9 हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मात्र, देशपातळीवरील बाजाराची तशी स्थिती नसल्याचे व्यापारी कलंत्री यांनी सांगितले आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6621 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6550 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6620 रुपये क्विंटल, जानकी चना 4800 रुपये क्विंटल, विजय चणा 4800, चना मिल 4600, सोयाबीन 6225, चमकी मूग 6225, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 6900 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

Mango: आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत ‘अशी’ घ्या काळजी, तरच उत्पादनात होईल वाढ

Chickpea: ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Crop Insurance : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट रब्बी पीकविमा योजनेवर, गतवर्षीच्या तुलनेत काय झाले बदल? वाचा सविस्तर