पुणे : यंदा प्रथमच 6 महिन्यांपेक्षा अधिकच्या काळापर्यंत (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम सुरु राहिलेला आहे. शिवाय पावसाळा सुरु होईपर्यंत गाळप चालूच राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जसा अतिरिक्त (Sugarcane) ऊसाचा अंदाज येत नाही त्याच प्रमाणे यंदा (Sugar Production) साखरेचे किती उत्पादन होणार याचादेखील अंदाज बांधणे मुश्किल होत आहे. कारण दर 15 दिवसाला तज्ञांनी वर्तवलेले अंदाज हे ‘फेल’ ठरत आहे. यंदा प्रथमच ऊसाचे गाळप वाढले आहे. त्यामुळे ‘इस्मा'(इंडियन शुगर मिल) ने आता सुधारित अंदाज वर्तवला असून यंदा देशात 350 टन साखरेचे उत्पादन होईल असे सांगितले आहे. शिवाय अजून तब्बल 90 लाख टन उसाचे गाळप बाकी आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत ऊस गाळप हे सुरुच राहणार असून आता अंतिम टप्प्यात परराज्यातूनही ऊसतोड यंत्रे मागवली जाणार आहेत. वाढत्या ऊस क्षेत्रामुळे गाळप आणि साखर उत्पादन यंदा विक्रमीच ठरणार आहे.
साखरेचे उत्पादन आणि ऊसाचे गाळप या दोन्ही प्रक्रियेमध्ये सध्या महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्नही महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे पुढील आठवड्याभरात आणखीन गाळ वाढणार आहे. देशात केवळ महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशात साखर कारखाने सुरु आहेत. तर आगामी आठवड्याभरात राज्यात 125 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. साखर उत्पादनात वाढ होत असताना दुसरीकडे अतिरिक्त ऊस देखील महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत साखर कारखाने हे सुरुच राहतील असा अंदाज आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात 90 लाख टन ऊसाचे गाळप बाकी आहे. विक्रमी क्षेत्र अन् विक्रमी उत्पादन अशीच सध्याची ऊसाची अवस्था आहे.
हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यातील केवळ 34 साखर कारखान्यांना बंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 118 साखर कारखाने हे बंद झाले होते. यावरुनच वाढलेले गाळप लक्षात येते. असे असले तरी अजून पावसाळ्यापर्यंत गाळपाचे नियोजन झाले तरी ऊस शिल्लकच राहतो की काय अशी स्थिती आहे. शिवाय मराठवाड्यातील ऊसाचे गाळप करण्यासाठी बंद केलेल्या कारखान्यांची यंत्रणा वापरली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीची यंत्रणा ही मराठवाड्यात दाखल झाली आहे. त्यामुळे किमान ऊसाची तोड तरी होत आहे. दुसरीकडे कर्नाटकातील साखर कारख्यांन्याची यंत्रणा घेण्याचे प्रयत्न प्रशासकिय पातळीवर सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आणि आता कर्नाटकातील यंत्रणा कामाला लागली तर अतिरिक्त उसाचा प्रश्न काही का होईना मार्गी लागेल असा अंदाज आहे.
Agricultural Department : ज्वारीची उत्पादकता वाढली उत्पादन घटले, दरावर काय होणार परिणाम ?