लातूर: सध्या कृषी क्षेत्रात चर्चा आहे ती कांदा आवकची आणि लागवडीची. एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी कांदा आवकचे नव-नवीन विक्रम होत आहेत. असे असताना दुसरीकडे (Agricultural Department) कृषी विभागाने यंदा (Summer Season) उन्हाळी हंगामात विक्रमी (Onion Cultivation) कांदा लागवड होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुख्य पिकाला बाजूला सारत कांदा या नगदी पिकावरच भर दिला आहे. शिवाय यंदा कांद्यासाठी पोषक वातावरण आणि बियाणांची उपलब्धता असल्याने लागवडीत वाढ होत आहे. यापूर्वी बियाणाचा प्रश्न उपस्थित राहत होता. पण आता शेतकरी स्वत:च कांद्याच्या बियाणाची उपलब्धता करीत आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात आतापर्यंत 3 लाख 95 हजार हेक्टरावर लागवड झाली आहे तर अजूनही लागवड ही सुरुच आहे. राज्यात उन्हाळी हंगामात कांद्याचे सरासरी क्षेत्र हे 2 लाख 60 हजार एवढे असताना त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे आता क्षेत्र तर वाढले आहे त्यातुलनेत उत्पादनात वाढ होणार का हे पहावे लागणार आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत झाले असले उन्हाळी हंगामातील पिकांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नधान्य ऐवजी कडधान्यावर अधिकचा भर दिला आहे. शिवाय कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण आणि बियाणांची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी या नगदी पिकाला पसंती दिली आहे. गतवर्षी कांदा बियाणाची उपलब्धता झाली नव्हती शिवाय दरामध्येही वाढ झाली असल्याने यंदा शेतकऱ्यांनी घरगुती पातळीवरच कांदा बियाणे तयार केले आहे. शिवाय खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे.
कांदा हे नगदी पीक असले तरी दराच्या बाबतीत तेवढेच लहरीचे आहे. एका रात्रीतून कांद्याचे दर वाढतात अन्यथा कमी होतात. शिवाय वातावरणातील बदल हे एक नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. कांद्यावर करपा, थ्रीप्स या रोगांचा प्रादुर्भाव तर ठरलेलाच आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढवून उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील कांदा काढणीनंतर साठवणूकीसाठी योग्य ती व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रापेक्षा उत्पानावरील खर्च मर्यादीत ठेऊन उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे मत कृषितज्ञ व्यक्त करीत आहेत.
Organic Farming: सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज : भगतसिंग कोश्यारी
ऊस बिलातून वीजबिल वसुलीचे पुन्हा संकेत, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय म्हणाले सहकार मंत्री ?