पुणे : यंदा उन्हाळी हंगमात शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये असा काय बदल केला आहे की, उत्पादनात आणि उत्पन्नामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर (Chickpea Crop) हरभऱ्याचा पेरा झाला होता. शिवाय उताराही अधिक पडल्याने (Warehousing Corporation) वखार महामंडळाच्या विविध गोदामामध्ये सुमारे 1 लाख 75 हजार टन हरभऱ्याची साठवणूक झाली आहे. असे असतानाही राज्यातील खरेदी केंद्रवर ही विक्री सुरुच आहे. केवळ खरेदी केलेलाच हरभरा नाही तर व्यापारी खरेदीसह शेतीमाल तारण योजनेतील साठवणूक केली जाते. अखेर विक्रमी उत्पादनात वाढ झाल्यानेच हे शक्य झाले आहे.
नाफेडच्या वतीने राज्यभर हरभरा हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. 1 मार्चपासून या हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. खरेदी केंद्रावरील हरभरा, शासकीय खरेदी, व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी तसेच शेतीमाल तारण योजनेतील साठवणूक केलेला हरभरा हा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आला आहे. राज्यातील 6 विभागातील 21 जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या गोदामात या पिकाची साठवणूक केली आहे.
यंदा हरभऱ्यासाठी पोषक वातावरण असल्याने कृषी विभागाने देखील हरभऱ्याच्या पेरणीबाबत मार्गदर्शन केले होते. शिवाय शेतकऱ्यांसमोर देखील हाच पर्याय चांगला होता. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा तर झालाच पण एकरी 10 ते 12 क्विंटलचा उतारा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी या मुख्य पिकाला डावलून हरभऱ्यावर भर दिला होता. अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम इतर पिकांवर झाला असला तरी हरभऱ्याचे नुकसान टळले होते.
राज्यातील सहा विभागातील 21 जिल्ह्यामध्ये वखार महामंडळाची गोदमे उभारण्यात आली आहेत. यामध्ये अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील गोदामामध्ये 64 हजार 522 टन, औरंगाबाद विभागातील 2 जिल्ह्यामध्ये 8 हजार 265 टन, लातूर विभागातील 5 जिल्ह्यातील वखार महामंडळात 78 हजार 532 टन, नागपूर विभागातील 4 जिल्ह्यातील गोदामात 6 हजार 748 टन, नाशिक विभागातील 3 जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात 16 हजार 131 टन तर पुणे विभागातील 2 जिल्ह्यातील गोदामात 3 हजार 712 टन हरभऱ्याची साठवणूक करण्यात आली आहे.
Cotton Crop : बाजार समितीचा पुढाकार अन् पीक पध्दतीमध्ये बदल, आटपाडीला मिळणार गतवैभव !