अकोला : (Agricultural prices) शेतीमालाचे दर हे उत्पादनावर आधारित असतात. उत्पादनात घट झाली की दरात वाढ आणि मागणीपेक्षा अधिक उत्पादन झाले तर दरात घट ही ठरलेलीच आहे. गेल्या काही वर्षांपासून (Maize Crop) मका पिकाला किमान (Guarantee Rate) हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. यंदा मात्र, परस्थिती बदलत आहे. घटत्या उत्पादनामुळे प्रथमच मक्याला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील मलकापूर ही मका पिकाची मुख्य बाजारपेठ आहे. वाढत्या मागणीमुळे हा विक्रमी दर मिळाला आहे. सध्या मक्याला 2 हजार 165 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तर यंदाच्या हंगामात 1 लाख 88 हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे.
दरवर्षी मक्याच्या दरात घट हा ठरलेलीच होती. केवळ चारा पीक म्हणून मकाची लागवड केली जात होती. अशा या प्रतिकूल परस्थितीमुळे यंदा मका लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती तर दुसरीकडे पोषक वातावरणामुळे उत्पादनात भर पडली. मात्र, मुळातच क्षेत्र घटल्याने आवकवर त्याचा परिणाम झाला आहे. आवक घटल्याने मलकापूर बाजार समितीमध्ये मकाला 2 हजार 165 असा दर मिळाला आहे. पण या विक्रमी दराचा फायदा हा मोजक्याच शेतकऱ्यांनाच झालेला आहे. मकासाठी नाफेडने 1 हजार 830 असा दर ठरवून देण्यात आला असला तरी आता 2 हजारांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीपिकावर होतो. शिवाय गेल्या तीन वर्षापासून हा बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. मलकापूर तालुक्यात मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. पण गेल्या काही वर्षांपासून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांनी अखेर पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. त्यामुळे क्षेत्र घटले असले तरी विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
मका पिकाचा दुहेरी फायदा होतो म्हणून शेतकऱ्यांचा यावर भर असतो. पण वातावरणातील बदलामुळे या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे उत्पादन क्षेत्र घटले. त्यामुळेच यंदा 2 हजार 165 असा विक्रमी दर मिळाला आहे. दरवर्षी किमान हमीभावाप्रमाणे का होईना मक्याची खरेदी करावी अशी मागणी असते. पण यंदा शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिकचा दर मिळाला आहे.तर दुसरीकडे चारा पीक म्हणूनही याचा वापर होत आहे.
Weather Update : राज्यात ऊन-पावसाचा खेळ, आणखी पाच दिवस धोक्याचेच…! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?