गडचिरोली : जिल्ह्यातील पाच बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी या चार बाजार समितीमध्ये निकाल जाहीर झालेत. दोन बाजार समितीमध्ये भाजप प्रणित पोरेड्डीवार गटाने बाजी मारली, तर एकावर आदिवासी विद्यार्थी संघटना आणि दुसऱ्या बाजार समितीवर अतुल गण्यारपुवार सहकारी गटाने बाजी मारली. सिरोंच्यात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज सायंकाळी सिरोंचा बजाज समितीच्या निकाल जाहीर होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय असलेले बाजार समितीत भाजपच्या वर्चस्व होते. या बाजार समितीत भाजप शिंदे गटाच्या युतीने एकतर्फी विजय मिळवला. या ठिकाणी मोठा पराभव काँग्रेस आणि वेगळ्या पक्षाला स्वीकारावा लागला.
आरमोरी बाजार समितीत भाजप आणि शिंदे गटाची युती होती. सध्या या भागात आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजप पक्षाचे आमदार कृष्णा गजभिये आणि सहकार महर्षी अरविंद सावकार प्रोरेडीवार यांच्या प्रयत्नांनी आरमोरी बाजार समितीत 18 उमेदवारही भाजप शिंदे गटाचे विजयी झाले. येथेही मोठा पराभव काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेला स्वीकारावा लागला.
चामोर्शी बाजार समितीत एक मोठा राजकारण यावेळी निवडणुकीआधी दिसले. भाजप पक्षाच्या विरोधात स्थानिक नेते असलेले अतुल गण्यारपुवार पॅनलच्या माध्यमाने निवडणूक लढविण्यात आली. या चामोर्शी भागात भाजप पक्षातच दोन गट तयार झालेले आहेत. भाजपचे खासदार अशोक नेते यांचे समर्थकात एक गट तर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार चामोर्शी येथील रहिवासी असलेले देवराव होळी यांचा दुसरा गट.
या दोन गटाच्या भानगडीत भाजपच्या विरोधात स्थानिक नेते असलेले अतुल गण्यारपुवार यांनी एकतर्फी 12 उमेदवार विजयी केलेत. तर या ठिकाणी भाजप-शिंदे गट, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे मिळून तीन उमेदवार विजयी झालेले आहेत. एक उमेदवार बिनविरोध निवड तर दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. चामोर्शी क्षेत्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. ही ओळख आता नावापूर्तीच उरलेली आहे.
अहेरी बाजार समितीकडे जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आणि राजकीय मंडळीचे लक्ष लागले होते. या ठिकाणी तीन टर्ममध्ये मंत्री असलेले आणि सध्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि दमदार नेता धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला होती. भाजप पक्षाचे माजी पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला होती. स्थानिक पक्ष म्हणून ओळख असलेले आदिवासी विद्यार्थी संघटना आणि दीपक आत्राम, अजय कंकडालवार यांची प्रतिष्ठा पणाला होती.
अहेरी बाजार समितीच्या निवडणूक निकालाकडे लक्ष असताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे सुपुत्र चिरंजीव हर्षवर्धन बाबा आत्राम यांना पराभव स्वीकारावा लागला. न्यायरी ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या गटांनी एकतर्फी 11 उमेदवारांना विजय मिळवून अहेरी बाजार समितीवर सत्ता काबीज केली. या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप आणि वेगळ्या पक्ष मिळून फक्त पाच ते सहा उमेदवारांस विजय मिळविता आला.
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा शिंदे गटाची एन्ट्री दमदार झाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले राकेश बेलसरे यांचा विजय झाला. बाजार समिती गडचिरोली जिल्ह्यातील पाच बाजार समितीच्या निवडणुकीवर लक्ष ठेवणारे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी येथे उमेदवारांना विजय मिळवून देण्याकरिता यश प्राप्त केले.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे. मोठा पराभव यावेळी या दोन पक्षांना बाजार समितीच्या निवडणुकीत स्वीकारावा लागला. सिरोंचा बाजार समितीत सध्या निवडणूक सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत निकाल येणार आहे. या ठिकाणी मागील सत्तेत स्थानिक नेते असलेले सतीश गंजीवार आणि येनगंटी व्यंकटेशराव यांची सत्ता होती. आता सतीश गंजीवार हे एकतर्फी सत्ता हाती घेणार असे चित्र आहे.