औरंगाबाद: खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या कपाशीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. कापसाची जागा आता सोयाबीने घेतले असून (Marathwada) मराठवाड्यातीलच नाही तर राज्यात सोयाबीन हेच मुख्य पीक झाले आहे. मात्र, यंदाच्या दराचा विचार करता (Agricultural Department) कृषी विभागाला आपल्या धोरणात बदल करावे लागतील असेच चित्र आहे. कारण फरदडमुळे होणारे नुकसान आणि बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी (Cotton Crop) कापसाला पर्यायी पीक घेण्याचे आवाहन केले जात होते. पण आता आगामी काळात कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा निर्वाळा कृषी विभागानेच दिला आहे. त्यामुळे यंदा कापसाला मिळालेला विक्रमी दराचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होणार हे नक्की आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. पण आता कापूस 10 हजारावर स्थिरावलेला असून सध्या खरेदी केंद्रावर फरदड कापसाची आवक सुरु आहे.गेल्या 10 वर्षात अशाप्रकारे कापसाच्या दरात वाढ झाली नव्हती. पण यंदा घटलेल्या उत्पादनामुळे पांढऱ्या सोन्याला अधिकची झळाळी मिळाली आहे.
घटते दर आणि बोंडअळीच्या इतर पिकांवरही होत असलेला परिणाम यामुळे गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटलेले आहे. घटते क्षेत्र यामध्ये यंदा अधिकचा पाऊस आणि पीक अंतिम टप्प्यात असताना वाढलेला बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात निम्म्यानेच घट झाली होती. एकरी 7 ते 8 क्विंटलचे उत्पादन थेट 2 ते 3 क्विंटलवर येऊन ठेपले होते. उत्पादनात घट अन् बाजारपेठेत वाढलेली मागणी यामुळे कापसाला या हंगामात सर्वाधिक 11 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. घटलेले क्षेत्र आणि निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसला तरी वाढीव दरामुळे ती कसर ही भरुन निघाली होती.
कापसामुळे दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान होते शिवाय शेतजमिनीचा दर्जाही खालावतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला इतर पिकांचा पर्याय निवडण्याचे आवाहान कृषी विभागाच्या माध्यमातूनच केले जात होते. पण यंदाचे दर पाहता आता आगामी काळात कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागानेच व्यक्त केला आहे.यापूर्वी 5 हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिकचा दर कापसाला मिळत नव्हता पण शेतकऱ्यांचा कल आता नगदी पिकावर आहे. त्यामुळे आगामी खरीपात सोयाबीन बरोबर कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
Latur Division : ज्वारी क्षेत्रात घट, हरभऱ्यात दुपटीने वाढ, मुख्य पिकाकडेच का होतेय दुर्लक्ष?
शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा ‘आधार’, हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात