नांदेड : वाढत्या उन्हामुळे (Seasonable Crop ) हंगामी पिकांच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत कलिंगड, लिंबू याच्या दरात वाढ झाली आहे. पण नैसर्गिक गारवा असलेली (Cucumber crop) काकडीही यंदा भाव खात आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झालं नाही ते हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. काकडी ही (Health) आरोग्यासाठी चांगली असते शिवाय यामध्ये नैसर्गिक गारवा असतो त्यामुळे मागणीत वाढ होत आहे. सध्या 1 किलो काकडीसाठी 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. यातच शेतकरी कुण्या व्यापाऱ्याला काकडी विकत नाही तर स्वत:च मार्केट जवळ करीत असून अधिकचा नफा घेत आहे. त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाबरोबर विक्रीमध्येही बदल करुन शेतकरी उत्पन्नात वाढ करीत आहे.नांदेड जिल्ह्यामध्ये हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर वाढत आहे.
कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न यासाठी हंगामी पिके हे चांगले माध्यम झाले आहे. पण दरवर्षी पाण्याची निश्चितता नसते. त्यामुळे शेतकरी हे पीक पध्दतीमध्ये बदल करण्यास धजावत नाहीत. पण यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने भर उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड, काकडी अशा हंगामी पिकांची लागवड केली होती. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. नांदेडमध्ये यंदा प्रथमच काकडी क्षेत्रात वाढ झाली आहे.
हंगामी पिकांची जोपासणा व्यवस्थित झाल्यास यामधून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. काकडी, कलिंगड हे दोन महिन्यात उत्पन्न देणारी पिके आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमधील बदल यशस्वी ठरत आहे. दोन महिन्यात उत्पादन होणारे काकडीचे पीक आता काढणीला आलय, त्यातच नांदेडचे तापमान 42 अंशाच्या आसपास गेल्याने नैसर्गिक गारवा देणाऱ्या काकडीची मोठी मागणी वाढली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढत आहे पण योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्नात भर पडत नाही. उलट जे व्यापारी, मध्यस्ती आहेत ते अधिकचा फायदा घेतात. इतर शेतीमाल शेतकऱ्यांना स्वत:हून विक्री करता येत नसला तरी हंगामी पिकांची विक्री करता येते म्हणूनच काकडी, कलिंगड याची विक्री शेतकरीच करताना पाहवयास मिळत आहे. यामुळे कोणी मध्यस्ती राहत नाही शिवाय सर्व नफा शेतकऱ्यांच्या पदरीच. ग्राहकांना चांगला माल कमी किंमतीमध्ये मिळाल्याचे समाधान होते. त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाने शेतकऱ्यांना तारले आहे.
Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?
SMAM Kisan Yojana : शेती उपकरणे खरेदी करताय? मग ‘या’ योजनेचा लाभ घ्याच..!