Sadabhau Khot : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन, सादाभाऊ खोत यांचा इशारा

| Updated on: May 28, 2022 | 4:54 PM

अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज न मिळाल्याने सावकाराच्या दारात जातील आणि मग त्यांच्या गळ्यात फास आवळला जाईल हे सरकारने लक्षात घ्यायला हवं. आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, सरकारने डोळेझाक करू नये, अशी मागणीही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Sadabhau Khot : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन, सादाभाऊ खोत यांचा इशारा
सदाभाऊ खोत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या कांद्याचे भाव (Onion Rate) पडल्याने शेतकरी (Farmer) पुन्हा मेटाकुटीला आलाय. यावरूनच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय निर्माण झालाय. 1 रुपयांपासून 3 रुपयांपर्यंत कांद्याचे भाव झालेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. काही ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करण्यासारखी पाऊल उचलत आहेत. तरी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. गुजरात सरकारने कांद्याला 3 रुपये अनुदान घोषित केलंय, अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज न मिळाल्याने सावकाराच्या दारात जातील आणि मग त्यांच्या गळ्यात फास आवळला जाईल हे सरकारने लक्षात घ्यायला हवं. आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, सरकारने डोळेझाक करू नये, अशी मागणीही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांचा इशारा

प्रत्येक गोष्टीला केंद्राकडे बोट दाखवतात

तसेच 5 जूनला नाशीक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार आहे. 5 जूनला कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार, अशी माहिती आज सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. मुका आणि बहिरा असा पनणखात्याचा मंत्री लाभला आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. सरकारची एक मानसिकता झालीय की कोणताही प्रश्न आला की केंद्राकडे बोट दाखवायचं, याबाबत केंद्रांचीही काय मदत घेता येईल यासाठी राज्यातील पणनखात्याच्या मंत्र्यांनी केंद्राकडे जाऊन माहिती घ्यायला हवी पण तस होताना दिसत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. तर आम्ही केंद्राकडे त्यांच्यासोबत जायला तयार आहोत पण त्यांची अजिबात इच्छा नाही. असेही ते म्हणाले

हे सुद्धा वाचा

कृषिमंत्री फक्त मालेगावसाठी

तर एकटा नाशिक जिल्हा संपूर्ण भारताला कांदा पुरवू शकतो हे लक्षात घ्यायला हवं, याकडे सदाभाऊंनी लक्ष वेधलं. कृषिमंत्री राज्याचे नाहीयेत फक्त मालेगावचे आहेत. पोखरा योजनेसाठी फक्त मालेगावसाठी ठेवली संपूर्ण तालुक्यासाठी नाही. प्रत्येक गोष्ट मालेगाव प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली सुरुय, त्यांना राज्याची चिंता नाही, राज्याला कृषिमंत्री नाही अस मी समजतो, अशी टिकाही सदाभाऊ खोत यांनी दादा भुसे यांच्यावर केली आहे.

विधान परिषदेबाबत म्हणतात…

तसेच त्यांनी विधान परिषदेबाबतही सूचक विधान केलं आहे. मी चळवळीचा माणूस आहे. मला संधी मिळाली आम्ही काम केलं. पुन्हा संधी द्यायची की नाही हे पक्ष ठरवेल, असे ते म्हणालेत. तर मिटकरींनाही त्यांनी टोला लगावला आहे. अमोल चांगला वक्ता आहे. मी वक्तृत्व करत असताना कहाण्या सांगून वर आलो नाही मी लोकांच्या समस्या मांडल्या आणि वास्तव सांगून वर आलो. अमोल मिटकरी यांनी वास्तव न मांडता ते वर आले. इतिहास विकून नाही इतिहास शिकून मी वर आलोय, असा टोला त्यांनी लगावला.