सांगली : देशात मागच्या महिनाभरापासून टोमॅटोचे दर (TOMATO RATE) इतके वाढले आहेत की, सामान्य नागरिकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. त्याचबरोबर लसून सुध्दा मागच्या दोन दिवसांपासून २०० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करीत असताना अधिक त्रास होत आहे. जोपर्यंत बाजारात भाजीपाल्याची (VEGETABLE RATE) आवक वाढत नाही. तोपर्यंत भाजीपाला स्वस्त होणार नाही असं व्यापारी सांगत आहे. कोंथिबिरीचे दर घसरल्यामुळे सांगलीतील एका शेतकऱ्याने शेतात टॅक्टर फिरवला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) चांगलाचं व्हायरल झाला आहे.
सांगलीच्या बागणी येथील माळव्यासाठी प्रसिद्ध असणारे युवा शेतकरी शंकर गायकवाड यांनी त्यांच्या 20 गुंठे क्षेत्रावर केलेल्या कोथिंबिरीला दर नसल्याने रोटर फिरवला आहे. एका बाजूला टोमॅटोने गाठलेला दर आणि कोथिंबीरीचा पडलेला दर यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
शंकर गायकवाड हे मागील 10 ते 12 वर्ष झाली माळवे क्षेत्रात आहेत. शंकर गायकवाड यांनी यापूर्वी कांदा, कोथिंबीर, मेथी, वांगी, मिरची, टोमॅटो यामध्ये मोठ्या प्रमावावर उत्पादन घेतले आहे. पण सध्या कोथिंबिरीला पेंडीस 2 रूपये दराने विकली जात आहे. औषधे, मशागत याचा खर्च जास्त झाला असल्याने परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला. आपल्या कोंथिबीर शेतात त्या शेतकऱ्याने सरळ रोटर घातला आहे. एका बाजूला टोमॅटोने गाठलेला दर आणि कोथिंबीरीचा पडलेला दर यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
काल बुलढाण्यात सुध्दा एका शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकली होती. त्याचे सुध्दा फोटो व्हायरल झाले होते.