नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शहरात काम करणारे अनेक जण गावाकडे परतले. गावामध्येच त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. केरळमधील सीमा रथीश या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करतात. मात्र, लॉकडाऊन लागल्यानं त्या गावी म्हणजेंच मेंगोथ येथे गेल्या. तिथे त्यांनी नोकरीसोबत शेती करण्याचा निर्णय घेतला. शुगर क्वीन या कलिंगडाची लागवड त्यांनी आधुनिक पद्धतींनं केली. आतापर्यंत त्यांनी पाट टन कलिंगड विक्रीतून दोन लाख रुपये कमावले आहेत. (School Teacher Seema Ratheesh Grew 5 Tons Of Organic Watermelon and Earned Rs 2 Lakh Rupees )
सीमा रथीश या शेतकरी कुटुंबातीलचं, त्यांच्या वडिलांकडे म्हणजेच माधवन नायर यांच्याकडे 15 एकर शेती आहे. त्यामध्ये धान, सुपारी आणि रबर झाडं लावली आहेत. सीमा यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या भावांनी शेतीमध्ये उत्पादकता कमी झाली असून फायदा होत नसल्याचं सांगितलं. मात्र, सीमा यांनी जैविक शेती करणाऱ्या मित्रांकडून मार्गदर्शन घेतलं.
जैविक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सीमा रवीथ यांनी मित्रांकडून मार्गदर्शन घेतलं. त्यांनी क्वीन शुगर नावाच्या कलिंगडाची लागवड करण्याचा सल्ला दिला. सीमा यांनी नोव्हेंबरमध्ये एकूण जमिनीपैकी अडिच एकर शेतीमध्ये साफसफाई करुन पूर्वमशागत करुन घेतली. रोप लावल्यानंतर त्यांनी त्यामध्ये ठिबक सिंचन पद्धत, मल्चिंग पेपर, कंपोस्ट खत याचा वापर केला. सीमा या सकाळच्या वेळी रानात जाऊन काम करायच्या नंतर घरी परतायच्या. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खतांचा पुरवठा केला. जैविक खतांचा वापर केला. पाणी, जैवक खत या आधारे शेती केली.
सीमा यांच्या शेतात तयार झालेल्या कलिंगडाची पहिली तोडणी जानेवारी महिन्यात करण्यात आली. त्यावेळी माजी महसूलमंत्री ई चंद्रशेखर उपस्थित होते. पहिल्याच तोडणीत 3 टन कलिंगडांची तोडणी करण्यात आली. त्यानंतर ती कलिंगड कासरगोड, कन्नूर आणि थालास्सेरी या भागात पाठवण्यात आली होती.
सीमा रथीश यांनी पहिल्या 15 दिवसांमध्ये 25 रुपये किलो प्रमाणं कलिंगड विकली. सुरुवातीच्या काळात लोकांनी दर जास्त असल्याची तक्रार केली. मात्र, चव चांगली असल्यानं नंतर लोकांनी पुन्हा कलिंगड खरेदी केली. एप्रिलच्या हंगामात त्यांनी 2 लाखांची कमाई केली आहे.
Video | अंगणात पडली वीज, लोकांना विजेचे झटके, नारळाच्या झाडानेही पेट घेतला, घटना कॅमेऱ्यात कैदhttps://t.co/71TRgVZ0Zp#Pune | #Rain | #Lightning | #video | #ViralVideo
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 30, 2021
संबंधित बातम्या:
Weather Alert | मान्सूनचं आगमन लांबणीवर, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
पीक विम्याचा प्रश्न पेटला, अकोल्यात शेतकरी आक्रमक; विमा कंपनी व कृषी सहायकाविरुद्ध पोलिसात तक्रार
(School Teacher Seema Ratheesh Grew 5 Tons Of Organic Watermelon and Earned Rs 2 Lakh Rupees)