नांदेड : असे म्हणतात एखाद्या व्यवसायामध्ये 3 वर्ष सातत्य ठेवले तर त्या व्यवसायाचा जम बसतो. मात्र, (Farming) शेती याला अपवाद आहे. कारण 3 नव्हे तर गेली 20 वर्ष (Mosambi Orchard) मोसंबी फळबागाची जोपासणा करुन (Nanded) नांदेडच्या शेतकऱ्याला अद्यापही अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेमंत पाटील यांनी 20 वर्षापूर्वी 350 मोसंबीची लागवड केली होती. मात्र, बुरशीजन्य रोगामुळे वर्षाकाठी 5 ते 6 झाडे ही नष्ट होत आहेत. फळबाग जोपासण्यासाठी ठिबक सिंचन, औषध फवारणी वेळच्यावेळी केल्यानंतर अपेक्षित उत्पादन मिळते मात्र, व्यापारी अन् किरकोळ विक्रेत्यांच्या तावडीतून योग्य दरच पदरी पडत नाही. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारभावातील फटका यामुळे गेल्या 20 वर्षात शेती व्यवसाय काही उबदार आल्याचे चित्र नाही.
पारंपरिक पिकांना बाजूला सारत हेमंत पाटील यांनी तब्बल 20 वर्षापूर्वी मोसंबी फळबागेचा प्रयोग केला होता. दर्जेदार आणि केमिकल मुक्त फळ ग्राहकांना मिळावे म्हणून त्यांनी सेंद्रीय पध्दतीने बाग जोपासण्याचा निर्धार केला होता. यामुळे मात्र, उत्पादनात घटच होत गेल्याने पुन्हा त्यांनी रासायनिक खतांचा वापर सुरु केला होता. असे असले तरी मोसंबी बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्यांची 100 झाडे ही नष्ट झाली असून यंदा तर बुरशीबरोबर वाढत्या उन्हाचाही परिणाम झाला आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारपेठेतील घटते दर यामुळे गेल्या 20 वर्षात अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
केवळ उत्पादन वाढून उपयोग नाहीतर बाजारपेठेतील दरावरही सर्वकाही अवलंबून आहे. शेतकरी स्वत:चा शेतीमाल स्वत: विकू शकत नाही. याकरिता व्यापाऱ्यांची मध्यस्ती ही ठरलेलीच आहे. त्यामुळे शेतीमाल पिकवणे हातामध्ये असले तरी त्याचे मूल्य हे व्यापारी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा अधिकचा फायदा हा व्यापारी आणि किरकोळ विक्रत्ये यांना होत आहे.
फळबागांवरील बुरशीमुळे वर्षाकाठी मोसंबीची झाडे ही नष्ट होत आहेत. त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असून हे कमी म्हणून की काय यंदा वाढत्या उन्हाचाही धोका निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे फळांची गळती होतेय. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडांवर बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढलंय. सध्या बाजारात मोसंबीची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे पण उत्पादनात घट झाली आहे.
Agricultural Department : ज्वारीची उत्पादकता वाढली उत्पादन घटले, दरावर काय होणार परिणाम ?
Washim : निर्णय झाला पण दिलासा नाही, शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर टांगती तलवार
Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं