नागपूर : (Meteorological Department) हवामान विभागाचा अंदाज अगदी तंतोतंत खरा उतरत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जणू काही सूर्य आग ओकतोय अशीच स्थिती झाली आहे. या (Vidarbh) विभागातील अकोला, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तर पारा 45 अंशापेक्षा वर गेला होता. पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असतानाच विदर्भात आणि (Marathwada) मराठवाड्यात उन्हाच्या झळा ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे विदर्भात उन्हामुळे घराबाहेर डोकावणेही मुश्किल झाले आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शिवाय 2 मे पर्यंत विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. तर हवामान विभागाचा अंदाज हा खरा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट ही कायम आहे. या दरम्यानच्या काळात नागपूरचे तापमान 44.3 अंश सेल्सिअस, यवतमाळ 44.7 अंश सेल्सिअस तर अमरावती 44.4 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली होती. शिवाय आगामी चार ते पाच दिवस अशी स्थिती राहिल असा अंदाज आहे.
सध्या उन्हाचा पारा हा 45 अंशापर्यंत गेला असला तरी अशीच परस्थिती आणखीन काही दिवस राहणार आहे. शिवाय शुक्रवारसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. आता शनिवारपासून 2 मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. विभागातील प्रामुख्याने अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमानात आणखीन वाढ होईल असा अंदाज आहे. अकोला-45.4, अमरावती 44.4, बुलडाणा-42. 3, ब्रम्हपूरी-45.2, गडचिरोली 42.8 अशा प्रकारे वाढ झाली आहे.
विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी या जिल्ह्यांध्ये तापमानात वाढ झाली आहे. सध्या रब्बी हंगामाती पिकांची काढणी कामे झाले असली तरी आता मशागतीच्या कामांना देखील अडथळा निर्माण होत आहे. एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याच्या सुरवातीलाही असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
28 April: पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता.
आज दक्षिण मध्य महाराष्ट्र,दक्षिण कोकणच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता
Pl follow Heatwave guidelines@CMOMaharashtra pic.twitter.com/CNUIVZxhmb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 28, 2022