सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील एका कलिंगड शेतकऱ्याचे लॉकडाऊनने कंबरडे मोडले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अपार मेहनत घेऊन पिकविलेल्या पिकाचा भाव कवडीमोल झाला आहे. त्यामुळे या तरुण शेतकऱ्यापुढे आता करायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कसाल मधील निलेश गावडे या तरुण युवकाने गडमठ या परिसरामध्ये सात एकर मध्ये कलिंगडाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे.(Sindhudurg watermelon farmer facing problem due to second wave of corona and lockdown)
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्येही निलेश गावडे यांच्यासमोर ही परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वच मार्केट बंद असल्याने कलिंगड विक्रीला मोठा ब्रेक लागला. त्यामध्ये गावडे यांना 7 लाखाचं नुकसान झालाय. एवढं मोठं नुकसान भरून कस काढायचं हा समोर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. , अक्षरश: चार ते पाच एकरचे प्लॉट मधील कलिंगड जमीनदोस्त झाले आहेत.
निलेश गावडे दरवर्षी 7 ते 8 एकरमध्ये कलिंगड या पिकाची लागवड करतात. गतवर्षी देखील त्यांनी 7-8 एकरमध्ये कलिंगड या पिकाची लागवड केली. गेल्या वर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गतवर्षी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान यंदाच्या उत्पन्नात भरुन निघेल या हेतूने गावडे यांनी कलिंगडाचे पीक घेतले. मात्र,यावर्षी देखील कोरोना महामारीने अक्षरश: त्यावर पाणी सोडले.
निलेश गावडे सांगतात, दरवर्षी कलिंगड लागवडीसाठी प्रत्येकी एक एकरामागे 1 लाख रुपये खर्च येतो. मल्चिंग पेपर , ठिबक , पाईप लाईन , खते , मजुरी पाहता हा खर्च मोठा होतो. परिणाम: सात ते आठ एकरामध्ये सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. खतं आणि कीटकनाशकं विकत घ्यायची तर शेतकऱ्याला सगळी रक्कम रोख स्वरुपात द्यावी लागते.
लॉकडाऊनच्या आधी 8 ते 9 रुपये प्रति कलिंगड भाव मिळत असे. लॉकडाऊन मध्ये तर 1 ते 2 रुपये भाव मिळतो आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारीही मिळत नाही. शेतीसाठी केलेला खर्च प्राप्त व्हावा या कारणाने 1 ते 2 रुपयांनी व्यापाऱ्यांना कलिंगड द्यावे लागत आहे, असं निलेश गावडे सांगतात.
कोविड-19 चं संकट आलं नव्हतं तेव्हाही लागवडीचा वाढता खर्च, भावातला चढउतार यामुळे कलिंगडाची शेती बेभरवशाचीच होती, असं निलेश गावडे म्हणाले. आता सगळंच ठप्प झाल्यानंतर शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी यंदाचा हंगाम आतबट्ट्याचा ठरला आहे, असं शेतकरी म्हणत आहेत.
Video: नागपूरच्या रामटेकला तुफान गारपीट, पावसानं अर्धा तास झोडपलं, पुण्यासह विविध ठिकाणी पावसाचा अंदाजhttps://t.co/7fwewEfQsb#Maharashtra | #Rainupdate | #WeatherUpdate | #WeatherReport | #Nagpur | #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2021
इतर बातम्या:
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? सामना संपादकीयमधून सूचक इशारा?
मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय
(Sindhudurg watermelon farmer facing problem due to second wave of corona and lockdown)