नांदेड : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही संपता संपत नाही. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना हा सुरुच आहे. रब्बी हंगामानंतर सर्वकाही सुरळीत असताना अचानक (Nanded) जिल्ह्यातील सतिगुडा येथील आदिवासींच्या पाड्यावर आगीची घटना घडली. यामध्ये (Cattel Shed) जनावरांच्या गोठ्यांची राखरांगोळी झाली आहे. आता कुठे (Natural Hazards) नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरत असताना अशा घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे भर उन्हाळ्यात जनावरांच्या निवाऱ्याचा तर प्रश्न आहेच पण चार महिने शेतात राबून पिकवलेले धान्य आणि ज्वारीचा कडबाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. वातावरणातील बदलामुळे पीक वावरात उभे असताना धास्ती तर काढणीनंतर असे संकट यामुळे शेतकऱ्यांचे जीवनच बेभरवश्याचे होत आहे.
सतिगुडा या आदिवासी पाड्यावरील आगीच्या घटनेत कोणती जिवीतहानी झाली नसली तर येथील सहा शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नुकतीच रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी करुन मळणी प्रक्रिया पार पडली होती. यानंतर शेतकऱ्यांनी गोठ्यातच या धान्याची साठवणूक केली होती. चार महिने मेहनत, काढणी आणि मोडणीची कामे करुन पदरी काय तर केवळ निराशाच अशीच स्थिती येथील शेतकऱ्यांवर ओढावली आहे. योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादन वाढवले मात्र, अवघ्या काही क्षणात शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच या धान्याची राखरांगोळी झाली यापेक्षा दुर्देव ते काय..
आदिवासी पाड्यावरील या घटनेत एक-दोन नव्हे तर सहा गोठे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जनावरे बांधलेली नव्हती. या घटनेत गोठ्याचे तर नुकसान झालेत पण इतर शेती साहित्याचीही होळी झाली आहे. गोठ्याला लागूनच शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. रखरखते ऊन आणि वाऱ्यामुळे या आगीने लगतच्या गंजीही कवेत घेतल्या. त्यामुळे आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्वारी पेरणीपासून काढणीसाठी चार महिन्याचा कालावधी लागतो. मशागत, पाण्याचे नियोजन एवढे सर्व करुन पुन्हा काढणी, मोडणी आणि मळणीचे काम करुन ज्वारीचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते. मात्र, पदरी पडलेले उत्पादन कसे हिरावून घेतले जाते याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. या पाड्यावरील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम झालाच नाही असे चित्र आहे.
Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?