Solapur : माढ्याच्या मानेगावात जोरदार वादळीवारे, एकरातील द्राक्षांची बाग भुईसपाट

| Updated on: Mar 04, 2023 | 12:43 PM

अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे शेतकरीवर्ग मोठा टेन्शनमध्ये आला आहे. त्याचबरोबर आता सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षांची बाग भुईसपाट झाल्याने परिसरात बघ्यांची सुद्धा अधिक गर्दी आहे.

Solapur : माढ्याच्या मानेगावात जोरदार वादळीवारे, एकरातील द्राक्षांची बाग भुईसपाट
graps
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सोलापूर : माढा (Madha) तालुक्यात काल जोरदार वादळीवारे (stormy wind) झाल्यामुळे शेतकऱ्यांना (farmer) मोठा फटका सहन करावा लागला आहे. जोरदार वादळी वाऱ्याचा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. माढ्याच्या मानेगावातील प्रकाश जाधव या शेतकऱ्यांची १ एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. शेतकरी जाधव यांचे जवळपास २५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. माढा तालुक्यात इतर शेतकऱ्यांच्या शेतीचं सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

द्राक्षांची बाग भुईसपाट झाल्याने परिसरात बघ्यांची..

अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे शेतकरीवर्ग मोठा टेन्शनमध्ये आला आहे. त्याचबरोबर आता सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षांची बाग भुईसपाट झाल्याने परिसरात बघ्यांची सुद्धा अधिक गर्दी आहे. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता आहे.

भाजीपाल्याची आवक घटत असल्याचे चित्र वाशिम बाजारपेठेत दिसून येत आहे

उन्हाळ्यात दरवेळेस भाजीपाल्याची आवक घटते. त्याचप्रमाणे आता भाजीपाल्याची आवक घटत असल्याचे चित्र वाशिम बाजारपेठेत दिसून येत आहे. रविवार वगळता इतर दिवशी आवक कमी होत आहे. तर गुरुवार बाजारात भाजीपाला उत्पादक शेतकरी विक्रीसाठी येत असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात आवक असते. इतर दिवसांत मात्र, कमी आवक होत असल्याचे चित्र आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढत आहेत.

हे सुद्धा वाचा

उन्हाचा फटका केळी पिकालाही बसत आहे

आठवड्याभरापासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा फटका सर्वसाधारण नागरिकांसह केळी पिकालाही बसत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी केळी वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे. केळी पिकाला या उन्हाचा फटका बसू नये, यासाठी शेतकरीआपल्या केळी पिकाच्या आजूबाजूने नेट तसेच घरातील टाकाऊ कपड्यांचा वापर करून आपल्या शेताच्या आजूबाजूने लावून आपल्या शेतातील केळी उष्णतेपासून वाचवताना जिल्ह्यातील केळी उत्पादक दिसत आहे.