सोलापूर: कोरोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्याच काम शेती क्षेत्रानं केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपले लक्ष शेतीकडे दिले आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आव्हानं असताना देखील शेतकरी योग्य नियोजनाद्वारे शेतीतून भरघोस उत्पन्न देखील मिळवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आढिव येथील शेतकरी लक्ष्मण शिरसट (पापरकर ) यांनी डाळिंब शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवलं आहे. (Solapur Pandharpur Farmer Laxman Shirsat will earn 15 lakh rupees from Pomegranate production)
लक्ष्मण शिरसट (पापरकर ) यांच्याकड वीस एकर शेती आहे. शिरसट यांनी चार एकर शेतात भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. याकरिता उत्तम नियोजन आणि खत व्यवस्थापन करत त्यांनी त्यामधून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
पंढरपूर तालुक्यातील आढिव येथे लक्ष्मण शिरसट यांची शेती आहे. त्यांनी भगवा वाणाच्या डाळिंबाची ४ एकरावर लागवड केली आहे. लागवडी पासून बागेची जोपासना, शेणखत, मजुरी यासाठी ३ लाख रुपयांचा खर्च आला आहे.
लक्ष्मण शिरसट आणि त्यांचा मुलगा विक्रम यांनी या डाळिंब बागेच्या व्यवस्थापनाकडे काटेकोरपणे लक्ष दिले आहे.या 4 एकरावरील डाळिंब काढणी हंगाम आता सुरू झाला आहे.दिसायला लाल भडक रंग, मध्यम आकार , आणि चवीला गोडी अशी ही फळे झाडावर लगडली आहेत. भगवा वाणाच्या या डाळिंबाला दक्षिण भारतात केरळ , तामिळनाडू, कर्नाटक राज्यात अधिक मागणी आहे.
15 लाखांचं उत्पन्न मिळणार
सध्या एका किलोला 70 रुपये इतका दर त्यांना मिळत आहे. जवळपास 12 टन डाळिंब उत्पादन झाले आहे. या मधून त्यांना सर्व खर्च वजा जाता 15 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.त्यामुळे तालुक्यात या बागेची चर्चा रंगली असून त्यांनी घेतलेल्या कष्टाचे आणि घेतलेला उत्पन्नाचे सध्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. लक्ष्मण शिरसाट यांच्या शेतातून तामिळनाडूला डाळिंब रवाना झाली आहेत.
ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय, पडळकरांची जळजळीत टीका, फडणवीसांच्या निर्णयाचं कौतूकhttps://t.co/8IIaCk3uFv#OBC | #PoliticalReservation | #GopichandPadalkar | #DevendraFadnavis | #Vijaywadettiwar | @GopichandP_MLC | @VijayWadettiwar | @Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2021
संबंधित बातम्या
स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी
Solapur Pandharpur Farmer Laxman Shirsat will earn 15 lakh rupees from Pomegranate production