लातूर : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन अन् हरभऱ्याच्या आवकमध्ये जणूकाही चढाओढ लागली होती. (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दिवसाकाठी 20 हजार पोते तर हरभरा हे 30 हजार पोत्यांची आवक सुरु होती. शिवाय (Toor Crop) तुरीसाठी खरेदी केंद्र सुरु झाल्याने त्याचा आवकवरही परिणाम झाला होता. पण सध्या तुरीने मार्केट मारलं आहे. कारण (Guarantee Rate) हमीभावापेक्षा अधिकचा दर हा खुल्या बाजारपेठेत मिळत आहे. केवळ अधिकचाच नाही तर हमीभाव केंद्र आणि खुल्या बाजारातील दरात तब्बल 150 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे आता शेतकरी तुरीची विक्री करणार का सोयाबीन, कापसाप्रमाणे साठवणूक करुन दरवाढीची प्रतिक्षा करणार हे पहावे लागणार आहे.
यंदा खरिपातील सर्वच पिकांवर अवकाळीचा परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट म्हणजे बाजारपेठेत मागणी वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत हमीभावापेक्षा कमीच भाव तुरीला होता. त्यामुळे भविष्यात दरवाढ होईल की नाही याबाबत संभ्रमता होती. पण शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6 हजार 450 असा दर मिळाला तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर 6 हजार 300 हा दर ठरवून देण्यात आला आहे.
अगोदरच शेतकऱ्यांचा ओढा हा खरेदी केंद्राकडे नव्हताच. खरेदी केंद्रावरील प्रक्रिया आणि शेतीमालाबाबत मतभेद यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठच फिरवलेली आहे. यातच आता खुल्या बाजारपेठेत दर वाढल्याने आता खरेदी केंद्राचा विषयच येणार नसल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. शिवाय सोयाबीन आणि कापसाप्रमाणेच तुरीलाही विक्रमी दर मिळेल या आशेने शेतकरी तुरीचीही साठवणूक करीत आहेत. खरिपातील उत्पादनात घट झाली असली तरी यापूर्वी सोयाबीन आणि कापसाला विक्रमी दर मिळाल्याने उत्पन्न वाढले तर आता तुरीमधूनही हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून खरिपातील सोयाबीन आणि आता रब्बी हंगामातील नव्याने दाखल होत असलेल्या हरभऱ्याचे दर हे स्थिरच आहेत. सोयाबीन हे 7 हजार 230 तर हरभरा हे 4 हजार 550 वर स्थिरावले आहे. असे असले तरी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन 20 हजार पोते तर हरभऱ्याची आवक ही 30 हजार पोत्यांच्या घरात होत आहे.
Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला
Rabi Season : सुगीवर चिंतेचे ढग, खरिपाप्रमाणेच रब्बीचीही अवस्था, काय आहे शेतशिवारातले चित्र?