लातूर : शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात तब्बल 450 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे 7 हजार 350 वर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 900 वर येऊन ठेपले होते. त्यामुळे वाढलेले दर हे क्षणिक होते असाच समज शेतकऱ्यांचा झाला होता. मात्र, ज्याप्रमाणात सोयाबीन दरात वाढ झाली त्यापेक्षा अधिक गतीने दरही घसरले होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याकडेच सर्व (Farmer) शेतकऱ्याचे लक्ष लागले होते. पण शेतकऱ्यांना दिलासा देणारे चित्र सोमवारी बाजारपेठेत आहे. कारण 300 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, कमी वेळेत दरात अधिकचा अस्थिरता यामुळे (Soybean Stock) सोयाबीनची साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कायम आहे. पण शनिवारी घटलेल्या दराचा परिणाम आवक झाला आहे. तर सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 7 हजार 200 चा दर मिळाला आहे.
गतआठवड्यात दरात वाढ होत असल्याने 15 हजार पोत्यांची आवक ही थेट 30 हजार पोत्यांपर्यंत गेली होती. हंगामाच्या अंतिम टप्प्यात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढले होते. मात्र, हीच आवक कायम राहिली नाही. शनिवारी अचानक दरात मोठी घसरण झाली असे असतानाही 30 हजार पोत्यांची आवक ही लातूर बाजार समितीमध्ये झाली होती. त्यामुळेच सोमवारी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. सोमवारी दर वाढूनही 25 हजार पोत्यांची आवक झाली होती.
ज्या शेतकऱ्यांना गरज होती त्यांनी सोयाबीनची विक्री केलेली आहे मात्र, ज्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे त्यांनी अजूनही साठवणूकीवरच भर दिला आहे. मात्र, गेल्या आठ दिवासांतील चित्र पाहता साठवणूक की विक्री ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. शिवाय दरातील चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांनाही अंदाज हा बांधता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर ते फायद्याचे राहणार आहे. सध्या अस्थिरता निर्माण झाली असून यामध्ये कुणाचे साधणार आणि कुणाचे नुकसान होणार हे सांगता येत नसल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
गेल्या आठ दिवसातील चढ-उतारानंतर आता सोयाबीनचे काय होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. गावोगावात सोयाबीनचे दर जाणून घेण्यात शेतकरी दंग आहे. शिवाय विक्री की साठवणूक याबबातही विविध अंगाने चर्चा केली जात आहो. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीन बाजारपेठेच्या केंद्रस्थानी आले आहे.
लेट पण थेट : द्राक्ष निर्यात जोमात, रशिया-युक्रेन युध्दाचा निर्यातीवर काय परिणाम? वाचा सविस्तर
Smart Farmer : सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचीही स्थिती, शेतकऱ्यांचा ‘प्लॅन’ होणार का यशस्वी?