लातूर : हंगामात प्रथमच सलग आठ दिवस सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. (Kharif Season) खरीप पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सुरवातीपासून सोयाबीनच्या चढत्या-उतरत्या दरामुळे बेंचमार्क असलेल्या बाजार समितीमध्ये (Soybean Rate) सोयाबीनचे दर काय हा उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे.गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन हे 6 हजार 5oo रुपयांवर स्थिरावलेले आहे. त्यामुळे आवक थोड्या प्रमाणात वाढली असली तरी सोयाबीनपेक्षा खरीप हंगामातील हरभरा या पिकाची सध्या सर्वाधिक आवक (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे. वाढीव दर सोयाबीनला अन् आवक हरभऱ्याची अशीच काहीशी अवस्था बाजार समितीमध्ये झालेली आहे. मात्र, आता खरीप हंगामातील शेतीमालाची आवक घटून रब्बी हंगामातील पिकांची आवक वाढणार आहे. दरामध्ये काय होणार हे उत्पादनावर आणि आवकवरच ठरणार आहे.
खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर स्थिर झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून 6 हजार 500 रुपये क्विटंलचा दर मिळालेला आहे. वाढत्या दरामुळे आता कुठे आवक सुधारत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 19 हजार पोत्यांची आवक झाली होती. शेतकऱ्यांनी साठवूक केलेल्या सोयाबीनच्या विक्रीला सुरवात केली आहे. शिवाय भविष्यात उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाल्यावर दर कमी होतील या धास्तीने आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहेत.
संकटावर मात करीत अखेर रब्बी हंगामातील पिकेही अंतिम टप्प्यात आली आहेत. तर पहिल्या पेऱ्यातील हरभरा या पिकाच्या काढणीला सुरवातही झाली आहे. हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. दिवसेंदिवस हरभऱ्याच्या आवकमध्ये वाढ होत आहे. दर कमी असले तरी सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची साठवणूक न करता काढणी झाली की थेट विक्री असेच धोरण शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहे. हरभऱ्याला सध्या 4 हजार 700 एवढा दर मिळत आहे. शिवाय काढणीनुसार आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
रब्बी हंगाम : रात्री अखंडीत अन् दिवसा अनियमित विद्युत पुरवठा, सांगा शेती करायची कशी?
खुशखबर..! ‘ती’ 25 टक्के रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, काय आहे सरकारचा आदेश?
Photo : शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरातील ऊस भस्मसात