गणेश सोलंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही सोयाबीन पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. मागील वर्षी सोयाबीनला 9 हजारांच्यावर दर मिळाला होता. मात्र यावर्षी तो दर कमी होऊन 5 हजाराच्या आत आला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनाचा खर्च सुद्धा निघेनासा झाला असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. सोयाबीन दर वाढतील, अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन विकले नाही. मात्र बाजारात सोयाबीन दर वाढायला सुद्धा तयार नाहीत. एकीकडे सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खताचे नियोजन करायचे आहे. मात्र सोयाबीन विकली नसल्याने त्याचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यानं (FARMER NEWS IN MARATHI) समोर उभा आहे. त्यामुळे दर वाढ व्हावी हीच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील शोभा परमेश्वर तेजल यांच्या शेताच्या मधोमध डीपी आहे. त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडणी केलेली आहे. परंतु महावितरण मार्फत टाकण्यात आलेले विद्युत खांब हे जास्त अंतरावर असल्याने विद्युत पुरवठा सुरू असलेले तार या खाली लोंबकळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून मशागतीची कामे करावी लागत आहेत. या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र अजूनही विद्युत तार वरती न घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मागील वर्षी कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र या वर्षी कापसाला 7 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी व शेतकऱ्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर कापूस फेकून आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कापसाला प्रतिक्विंटल 13 हजार रुपये भाव होता. मात्र या सरकारने बाहेर देशातून कापसाच्या गाठी आयात करून देशातील कापसाचे भाव पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला केला आहे.