लातूर : यंदा खरिपातील प्रत्येक पिकाच्या उत्पादनात घट होत आहे. असे असतानाही पदरी पडलेल्या शेतीमालातूनही अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी आता नवनवीन शक्कल लढवत आहे. यापूर्वी (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात चढ-उतार झाले तरी शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिकाच फायद्याची राहिलेली आहे. आता बाजारपेठेत (Toor Inflow) नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. सध्या तुरीला 6 हजार ते 6 हजार 200 चा दर मिळत आहे. ही हंगामाची सुरवात असली तरी भविष्यात घटलेल्या उत्पादनामुळे दर वाढतील असाच अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Latur Market) बाजारपेठेचा आणि बदलत्या सरकारच्या धोरणाचा अभ्यास करुन जर तुरीची विक्री केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. सध्या हमीभाव केंद्रावरील दराप्रमाणेच खुल्या बाजारपेठेत दर आहेत. पण शेतकरी लागलीच तूर विक्रीच्या मानसिकतेमध्ये नसल्याचे होत असलेल्या आवकवरुन दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या घरातच आहेत. यामध्ये ना वाढ होतेय ना घट. असे असले तरी सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेले सोयाबीन आहे. मात्र, दरात घट किंवा दर स्थिर असल्याने त्याची साठवणूक करावी की विक्री हा प्रश्न हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कायम आहे. सबंध जानेवारी महिन्यात सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या आसपास राहिलेले आहेत. अशातच तुरीची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला तुरीचे काय चित्र राहणार हे महत्वाचे आहे.
नाफेडच्यावतीने तुरीला 6 हजार 300 रुपये प्रती क्विंटलचा दर ठरविण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात 186 ठिकाणी हमीभाव केंद्रही सुरु करण्यात आली आहेत. मात्र, हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेतील दरही वाढण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 तर खुल्या बाजारपेठेत 6 हजार 200 अशी स्थिती आहे. मात्र, तुरीमध्ये जर आर्द्रतेचे प्रमाण जर 10 टक्के पेक्षा अधिक असेल तर त्याची खरेदी ही केंद्रावर केली जात नाही. शिवाय येथील अटी-नियम यामुळे शेतकरी थेट खुल्या बाजारपेठेत विक्री करीत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येक उत्पादनामध्ये घट ही झालेली आहे. असे असले तरी त्याची कसर ही दरामधून भरुन निघते हे सोयाबीन आणि कापसामधून पाहवयास मिळालेले आहे. त्याचप्रमाणे आता तुरीबाबतही शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आणि सरकारच्या धोरणांचा अभ्यास करुनच विक्री केली तर फायद्याचे राहणार आहे. त्यामुळे दर घटले तर साठवणूक आणि दरात वाढ झाली तर टप्प्याटप्प्याने विक्री हेच सुत्र अवलंबले तर अधिकचा फायदा होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.
Kharif Season: अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी, घोषणांचा पाऊस, सवलतीचे काय?
Onion Market: ज्याच्यामुळे केला अट्टाहास त्याचीच पुन्नरावृत्ती, सोलापुरात नेमकं काय घडलं?