वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात अधूनमधून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांची स्थिती तुलनेने चांगली होती. मात्र, वाशिम जिल्ह्याच्या वारला महसूल मंडळातील वाई, वारला, शिरपुटी, कृष्णासह 18 गावात पावसा अभावी बळीराजा संकटात आलाय. या गावांमधील खरिपाच्या सोयाबीनचं पावसा अभावी 90 टक्के उत्पादन घटणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तब्बल 20 दिवस पाऊस न पडल्यानं फुलांच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनला शेंगाच लागणार नाहीये. त्यामुळे सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही वसूल होणार नाही.
वाशिममध्ये तब्बल 20 दिवस पावसांचा खंड, 18 गावांमधील बळीराजा संकटात, सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट, दुसरीकडे केंद्राने आयात सुरू केल्यानं उरल्या सुरल्या सोयाबीनच्या दरात अडीच-तीन हजाराची घसरण@dadajibhuse #Farmer #Rain #FarmerPolicy pic.twitter.com/xRPFJYclhO
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 14, 2021
जिल्ह्यात यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडला. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीनचं उत्पान पावसाने उघडीक दिल्यानं संकटात आलं आहे. या 18 गावांमध्ये ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन पीकाला पावसानं खंड दिल्यानं झटका बसलाय. त्यामुळे पिकाचं एकरी उत्पादन घटणार आहे. केलेली मेहनत आणि खर्च वाया जाणार असल्यानं शेतकरी चिंतेत आलाय. यानंतर आर्थिक संकट ओढविण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरम्यान, दुसरीकडे केंद्र शासनाने सोयाबीनची आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात सोयाबीनचे दर सतत कोसळत आहेत. अवघ्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात अडीच ते तीन हजार रुपयांची घसरण झाली. मागणी घटल्याने आता सोयाबीन खरेदी करून ठेवलेले व्यापारीही अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Soybeans production may decrease by 90 percent in Washim know why