मुंबई : उत्पादन घटण्यामागे (Pest Disease) किड-रोगराईचा मोठा रोल आहे. सध्या अमेरिकन लष्करी (Larvae) अळीमुळे मका पिकाच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा शोध सुरु असून आता अमेरिकन लष्करी अळीला बाल्याअवस्थेतच नियंत्रण करण्यावरुन संशोधन सुरु आहे. (New Technology) नव्या तंत्रज्ञानाच्या सहायाने ‘ऑक्सिटेक’ आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने या अळीचे जीएम नर पतंग विकसित केले आहेत. त्यामुळे ही अळी बाल्याअवस्थेतच त्यावर नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील नुकसान टळणार आहे. त्यामुळे भविष्यात अमेरिकन लष्करी अळीपासून पिकांची सुटका होऊ शकते.
ब्राझिलमध्ये सर्वाधिक मकाचे पीक घेतले जाते. याच देशाने ‘ऑक्सिटेक’ कडून सुरु असलेल्या चाचण्यांसाठी संमती दिली आहे. जगातील ब्राझिल असा देश आहे ज्याने या चाचण्यांसाठी संमती दर्शवली आहे. अमेरिकन लष्करी अळी हा केवळ भारतामधील शेतकऱ्यांसमोरचाच नाहीतर जगभरातील शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न आहे. सध्या केवळ रासायनिक किटकनाशकांचा वापर करुन ही अळी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ऑक्सिटेकच्या नव्या तंत्रज्ञानामुळे बंदोबस्त होणार का याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
‘ऑक्सिटेक’ या तंत्रज्ञानामध्ये ‘सेल्फ लिमिटींग जीन’ म्हणजेच स्वमर्यादा जनुक असणार आहे. यामध्ये अमेरिकन लष्करी अळाचे जनुकीय सुधारित नर पतंग विकसित केले गेले आहे. यामुळे पतंगांवर आधारित पुढील पिढीतील मादी पिलांना प्रौढावस्थेत जाण्यापासून रोखले जाऊ शकते. म्हणजेच अळी ही बाल्यावस्थेच राहिल्याने तिचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होणार नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत संशोधन सुरु असले तरी यासंबंधीचे उत्सुकता सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागली आहे. कारण या अळीचा सर्वाधिक धोका हा मका पिकाला आहे. मक्याचे पीक ब्राझिल देशात सर्वाधिक घेतले जात असले तरी भारतामध्येही मका उत्पादक शेतकरी आहेत. शिवाय अमेरिकन अळीमुळे मका पिकाच्या उत्पादनातच घट नाही तर पीकच उध्वस्त होते. त्यामुळे हे संशोधन यशस्वी झाले तर मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.