पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विशेषत: मराठवाड्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंबंधीची सर्व माहिती प्रशासनाला होती. शिवाय मराठावड्यात वाढलेले क्षेत्र आणि (Sugar Factory) साखर कारखाना यंत्रणाही माहिती असूनही या अतिरिक्त ऊस प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यानेच बीडच्या 32 वर्षीय शेतकऱ्याने उसाच्या फडाला लागूनच असलेल्या झाडाला (Farmer Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यकर्त्यांनो अजून किती मुडदे पाडणार आहोत आणि किती मुडद्यांवर तुम्ही राज्य करणार आहात अशा शब्दाने राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल आपला रोष व्यक्त केला आहे. साखर कारखान्यांचा भोंगळ कारभार आणि प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यामुळे नामदेव जाधव या शेतकऱ्याचा संबंधित यंत्रणेनेच बळी घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकरावर केला आहे.
गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी 2 एकरामध्ये ऊस लागवड केली होती. शिवाय यामधून भरघोस उत्पादन होईल असा आशावाद होता. मात्र, उसाचा कालावधी संपूनही तोड होत नव्हती. दरम्यान, जाधव यांनी साखर कारखाना, मुकादम, उसतोड कामगार यांचे पाय धरले होते. परंतु, ना कारखाना प्रशासनाने याकडे लक्ष दिले ना जिल्हा प्रशासनाने. त्यामुळे हताश झालेल्या जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे हा यंत्रणेने घेतलेला बळी आहे. ज्या ऊस पिकावर सर्वकाही अवलंबून होते तोच ऊस डोळ्यादेखत करपून जात असल्याने जाधव यांनी आत्महात्या केली.
अतिरिक्त उसाबाबत शासन हे गाफील राहिलेले आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. लागवड क्षेत्र, अंदाजित उत्पादन, आणि साखर कारखान्यांची संख्या असे सर्वकाही असतानाही केवळ नियोजन झाले नाही. ज्याप्रमाणे पाणीटंचाई लक्षात घेताच विहिरींचे अधिगृहन करुन भविष्यातील काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे बंद पडलेले साखर कारखाने हे शासन स्तरावर सुरु करणे गरजेचे होते. पण तसे काही न झाल्यामुळे हा यंत्रणेचा बळी ठरला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
राज्यात आणि त्यामध्येच मराठवाड्यात अतिरिक्त उसाचे प्रश्न हा कायम आहे. कालावधी पूर्ण होऊन देखील तोड होत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. डोळ्यादेखत ऊसाचे होत असलेले नुकसान न सहन झाल्याने हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून गळफास घेतला. फडाला लागूनच असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेतला होता.
https://www.youtube.com/watch?v=Dg2KdcmdxQM