वाशिम : राज्यात कोरोना व्हायरसमुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची (टरबूज) लागवड केली. आता त्यांना यापासून एकरी 30 टन उत्पन्न अपेक्षित आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच बैलगाडीमधून 10 रुपये किलो दराने टरबूज विक्री केली. यातून त्यांना 6 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. लागवड खर्च वगळता त्यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे (Success story of Washim Farmer Raju Chaudhari Watermelon farming during lockdown).
वाशिममधील शेतकऱ्याची यशोगाधा
कामरगाव येथील राजू चौधरी यांनी 2 महिन्यांपूर्वी दोन एकरात कलिंगडाची लागवड केली. मात्र कलिंगड विक्रीला आले असता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागला. त्यामुळे विक्री कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र चौधरी यांनी आपल्या बैलगाडीमधून विक्री सुरू केली. थेट ग्राहक ते शेतकरी यापद्धतीने त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना या विक्रीत 10 ते 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्यामुळं त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं आहे.
कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागल्याने बाजारपेठ उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मात्र, राजू चौधरी यांनी स्वतःच कलिंगडाची विक्री केली. यामुळं त्यांना चांगला नफा मिळाला आहे. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीही यांच्याप्रमाणे पिकविलेला शेतमाल स्वतः विक्री केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही. यात शंका नाही.
हेही वाचा :
Washim | कोरोना काळातही शेतकऱ्याची धडपड, उन्हाळी पिकांची यशस्वी लागवड
कोरोनामुळे पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद
VIDEO | 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या वानराची थरारक सुटका
व्हिडीओ पाहा :
Success story of Washim Farmer Raju Chaudhari Watermelon farming during lockdown