इंदापूर : शेती व्यवसायात नवीन काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीने तरुण शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. यामधून कुणाची यशोगाथा होते तर कुणाच्या पदरी निराशा. असाच प्रकार (Indapur) इंदापुरातील 2 युवकांसोबत घडला आहे. (Traditional farming) पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी येथील नितीन पांढरे व अतुल घोडके या दोघांनी गेल्या अनेक महिन्यांपासून (Sheep rearing) शेळी पालन व्यवसाय उभारला होता. जिल्हाभरातील जनावरांचे आठवडी बाजार पालथे घालून शेळ्यांची आणि बोकडाची खरेदी करीत होते.अशा पध्दतीने त्यांनी 54 शेळ्या आणि बोकडाची खरेदी झाली होती. मात्र रविवारी अवघ्या 1 तासाच्या आतमध्येच या शेळ्या दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे नितीन आणि अतुलच्या पायाखालची मातीच सरकली. काही लक्षात येण्यापूर्वीच एका माघून एक अशा शेळ्या दगावल्या आहेत. त्यामुळे त्यांची मेहनत आणि स्वप्न सर्वकाही धुळीस मिळाले असेच झाले आहे.
पारंपरिक शेतीमध्ये केवळ कष्ट आणि कष्टच आहे त्यामुळे नितीन आणि अतुल याने काहीतरी नवीन करुन दाखवण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्यांनी अथक परीश्रम तर घेतलेच पण पाण्यासारखा पैसा खर्ची करुन शेळीपालनाला सुरवात केली होती. एका शेळीपासून केलेली सुरवात आता 54 संख्येवर पोहचली होती. पण अवघ्या काही वेळात सर्वच्या सर्व शेळ्या दगावणे यापेक्षा वेगळे दुख ते काय?
अचानकच 54 शेळ्या दगावल्याने कुणाच्याच काही लक्षात आले नाही की नेमका प्रकार काय आहे तो. या घटनेची माहिती पशूवैद्यकी अधिकारी यांना देताच अवघ्या काही वेळेत हजरही झाली. त्यांनी प्राथमिक तपासणी करुन चार शेळ्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवून देण्यात आले आहेत. नेमका हा प्रकार कशामुळे घडला याबाबत सध्या तरी सर्वजण अनभिज्ञच आहेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली पशुवैद्यकीय अधिकारी या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले व तेथील चार शेळ्यांचे शवविच्छेदन करून पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवून देण्यात आले आहेत. आता येथील अहवालावरच सर्वकाही अवलंबून आहे. अचानक सर्वच शेळ्यांचा मृत्यू झाल्याने विषबाधा की अन्य काही याचा तपास आता अहवालानंतरच लागेल.