लातूर : यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. यामध्ये (State Government) महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे हे सर्व असताना याच राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा तेवढाच ज्वलंत झाला आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात आणि उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असली तरी (Sugarcane Excess) अतिरिक्त ऊसाचे होत असलेले नुकसान हा चिंतेचा विषय आहे. कधी नव्हे ते मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आणि या विभागातीलच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम राहिलेला आहे.आता यावर उपाय म्हणून (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा साखर कारखाने हे 31 मे पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. असे असातनाही या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही याबाबत शंका आहे. शिवाय आता ऊस लागवड करुन 15 महिने उलटले आहे. त्यामुळे मे मध्ये तोड होऊन तरी काय उपयोग असा प्रश्न आहे.
गाळपाचा कालावधी वाढवून उपयोग नाही तर सध्याच्या काळात ऊस गाळपाची क्षमता वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या भागातील गाळप पूर्ण झाले आहे त्या साखर कारखान्यांनी मराठवाड्यातील ऊसाची तोड करावी असा प्रस्ताव आ. राणाजगजितसिंह यांनी साखर आयुक्तांसमोर ठेवला आहे. शिवाय याला मंजूरी मिळाली तर काही प्रमाणात का होईना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, यावर कोणताही निर्णय झालेला नाही.यंदा मराठावाड्यातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे ऊस गाळप केले आहे. मात्र, क्षेत्रातच एवढी वाढ झाली की वेळेत तोड करणे शक्य झालेले नाही.
ऊस गाळपाची क्षमता वाढली किंवा मे पर्यंत जरी गाळप सुरुच राहिले तरी उत्पादनात घट आता अटळ झाली आहे. कारण लागवडीनंतर 12 महिन्यांमध्ये ऊसाची तोड होणे गरजेचे आहे. आता लागवड करुन 15 महिने उलटले आहे. वेळेत तोड न झाल्याने पुढील उत्पादनही घेत येत नाही. यातच ऊसाचे पाणी तोडून दोन महिने उलटले आहेत. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी यंदा सर्वात नुकसानीचे ठरत आहे.
यंदा ऑक्टोंबर 2021 मध्ये ऊस गाळपाला सुरवात झाली होती. सर्वकाही वेळेत होऊनही मध्यंतरीचा अवकाळीचा अडसर वगळता गाळप हंगाम कायम सुरु राहिलेला होता. सलग 7 महिने गाळप हंगाम सुरु राहूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यंदाच्या अतिरिक्त ऊसाचा परिणाम आगामी लागवडीवर होणार असेच वातावरण सध्या मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे. अशीच परस्थिती राहिली तर ऊसाचे क्षेत्र घटणार हे नक्की.
PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!
Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात
Banana आता फळपिक, ‘मनरेगा’ मधूनही करता येणार लागवड, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?