मुंबई : अतिवृष्टी आणि सततच्या पावासाचा परिणाम खरिपासह फळपिकांवर झाला असला तरी सर्वात मोठ्या (Cash Crop) नगदी पिकाला याचा मोठा फायदा झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा (Rain) पाऊस झाल्याने राज्यात ऊसाचे क्षेत्रच वाढले नाहीतर पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादनही पदरी पडले आहे. यंदा तर उत्पादनाचे सर्व रेकॉर्ड मोडले असून अजूनही 90 लाख टन (Sugarcane Sludge) उसाचे गाळप शिल्लक आहे. यामुळे यंदा सर्वाधिक साखर उत्पादनाची नोंद होणार असून राज्यातून तब्बल 133 लाख टन साखरेचे उत्पन्न अपेक्षित आहे. गतवर्षीपेक्षा यामध्ये 25 टक्के वाढ होणार आहे .या पोषक वातावरणामुळे उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रातून साखरेचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात नंबर वन आहे.
ऊसाला पोषक वातावरण आणि वाढलेले क्षेत्र यामुळे यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशामध्ये ऊसावर मावा या किडीचा प्रादुर्भाव पडल्याने उत्पादनात घट झाली तर महाराष्ट्रात यापेक्षा उलटी स्थिती होती. राज्यात गतवर्षी 90 हजार हेक्टराने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. 2020-21 मध्ये उसाचे क्षेत्र 11 कोटी 40 लाख हेक्टर तर यंदा 12 कोटी 30 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. राष्ट्रीय पातळीवर देशात 350 लाख टन उत्पादनाची नोंद होणार आहे. याचा अर्थ राष्ट्रीय उत्पादनात ३८% वाटा एकट्या महाराष्ट्राचा असेल.’महाराष्ट्राला सलग दोन वर्षे चांगल्या मान्सूनचा फायदा झाला आहे.
साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ होऊन देखील त्याचा दरावर परिणाम झाला नाही. अन्यथा आवक मोठ्या प्रमाणात झाल्यावर त्याच्या दरावर परिणाम होणार हे बाजारपेठेचे सूत्रच आहे पण देशातील साखरेला निर्यातीचा मोठा आधार मिळाला आहे. देशात उत्पादित होणाऱ्या 80 लाख टन साखरेची निर्यात होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही साखर 60 लाख टनांनी वाढली आहे. आणखी 35 लाख टन इथेनॉल उत्पादनाकडे वळवले जात आहे. एकट्या महाराष्ट्राने 12 लाख टन ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवला आहे. वाढत्या उत्पादनामुळे साखर कारखान्यांकडूनही शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम ही थकीच ठेवली जात नाही. यामुळे 98 टक्के थकबाकी ही साखर कारखान्यांनी निकाली काढली आहे.
दरवर्षी 4 महिने चालणारा गळीत हंगाम यंदा मात्र, 6 महिने पूर्ण झाले तरी सुरुच आहे. सरासरीपेक्षा गाळप वाढले, साखरेचे उत्पादनही वाढले मात्र, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. लागवड क्षेत्र वाढल्यामुळे ही अवस्था झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोड अटोक्यात आली आहे पण मराठावाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. आता साखर आयुक्त यांनी पश्चिम महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यातील यंत्रणा मराठवाड्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.असे असतानाही पावसाळा सुरु होण्यापूर्वी तब्बल 50 हजार ऊसाचे गाळप शिल्लक राहील अशी अवस्था आहे.
Mango : यंदा आंब्याचा गोडवा दुरापस्तच, वातारवणातील बदलामुळे आंबा उत्पादनाची स्थिती काय?