उस्मानाबाद : मध्यंतरी कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याची तोड उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाली होती. त्यामुळे एका गावाचा प्रश्न मार्गी लागला होता. दरम्यान, ऊसतोड कामगार शिवारात दाखल होताच त्यांचे ढोल-ताशाच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले होते. मात्र, संबंध (Osmanabad District) उस्मानाबाद जिल्ह्यातील (Excess sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. याकरिता गावनिहाय शिल्लक ऊसाचे क्षेत्र तसेच ऊसतोडीचे नियोजन केले जाणार आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता एवढा एकच पर्याय असून यासंदर्भातला प्रस्ताव थेट साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. जर आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसतोडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
काळाच्या ओघात मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 11 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप झाले असले तरी ऊस शिल्लक आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही हीच अवस्था आहे. तसं पाहिला गेले तर मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या 5 वर्षांमध्ये ही ओळख पुसण्यात या विभागाला यश आले आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा योग्य नियोजन न झाल्यामुळे मार्च अखेरच्या टप्प्यात असताना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे गाळप झाल्यात जमा आहे. शिवाय जे शिल्लक क्षेत्र आहे त्याची तोडही वेळेत होईल मात्र, येथील यंत्रणा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कामी नाही आली तर मात्र, शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी सोलापूर येथील कारखान्यांची वाढीव मदत घेण्यात येणार आहे. एवढेच नाही तर साखर आयुक्त स्तरावरुन आदेश निर्गमीत करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. जोपर्यंत संपूर्ण ऊसाची तोड होत नाही तोपर्यंत गाळप बंद न करण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिले आहेत. असेच साखर कारखाने हे सुरुच राहिले तरी ऊसतोडीचा प्रश्न मिटतो की नाही अशी परस्थिती आहे. अजून 20 टक्के ऊस फडातच असून पावसाळा सुरु झाला तरी ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची मदत घेतली तर हा मधला मार्ग असणार आहे.
Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!
Guarantee Price Centre : बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना आधार खरेदी केंद्राचा, जनजागृतीनंतर आवक वाढली