लातूर : खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठीच नाही तर आगामी हंगामात बियाणांचा तुटवडा भासू नये म्हणूनही यंदा (Soybean Crop) सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा (Summer Season) उन्हाळी हंगामात विक्रमी पेरा झाला आहे. शिवाय मध्यंतरीच्या वातावरणातील अपवाद वगळता सध्या हे पीक मोठ्या जोमात बहरत आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होईलच पण दरवर्षी शेतकऱ्यांनी (Seed) बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही. खरीप हंगामात बियाणे उपलब्ध होण्याच्या उद्देशानेच बिजप्रक्रिया आणि योग्य ती खबरदारी घेऊन शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. खरीप हंगामात बियाणाची मागणी होताच कृत्रिम टंचाई तसेच फसवणुकीचे प्रकार हे सर्रास घडतातच. त्यामुळे उत्पादन नाही पण बियाणांच्या उपलब्धतेसाठी तरी सोयाबीनचा पेरा करण्याचे अवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते.
सोयाबीनचा पेरा झाल्यापासूनच त्याचा उपयोग बियाणासाठी करण्याच्या हेतूने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पीक 20 ते 25 दिवसाचे असताना मशागत करुन सोयाबीन तणविरहीत ठेवणे गरजेचे आहे. मशागतीची कामे ही फुले लागण्याच्या आगोदरच करणे गरजेचे अन्यथा सोयाबीनच्या मुळांना नुकसान होते. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाठानी पाणी द्यावे लागणार आहे. शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. उन्हाळी सोयाबीनची उत्पादकता कमी असली तरी बियाणाच्या अनुशंगाने योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळी हंगामातील सोयाबीनला उतारा ही कमीच असतो. त्यामुळे उत्पादनापेक्षा किमान खरिपातील बियाणाचा तरी प्रश्न मिटावा ही शेतकऱ्यांची भावना आहे. सोयाबीनवर पाने कुरताडणारी अळी, घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करणे गरजेचे आहे. मात्र, आता पीक वाढीसाठी पोषक वातावरण असून शेतकरी मशगतीच्या कामात व्यस्त आहे.
यंदा प्रथमच उन्हाळी हंगामाचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन गरजेचे होते. कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेऊन पेरणीपासून आता पीक जोमात असतानाही कृषी विभागाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. बिजोत्पादन कसे करायचे याचे धडे अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन दिल्याने हा बदल झाल्याचे कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे.
आता सातबाराच बंद, राज्य सरकारचा काय आहे निर्णय? वाचा सविस्तर
PM Kisan Mandhan Scheme : शेतकऱ्यांनाही आता पेन्शन, अर्ज करा अन् योजनेत सहभागी व्हा
हरभरा उत्पादन वाढीची सोपी पध्दत, तंत्रज्ञान वापराचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, वाचा सविस्तर