अमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावतीत होणाऱ्या संत्राची ओळख आहे. सध्या संत्राचा आंबिया बहार आलेला आहे. मात्र संत्रावर “तडक्या” नावाचा रोग आलाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्राची गळती होत आहे. परिणामी संत्रा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाकडून संत्रा उत्पादकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे. (tadkya Diseases of orange Crop Amravati Farmer big losses)
आंबट गोड चवीसाठी संत्राची ओळख आहे. संत्राचं सर्वाधिक उत्पादन विदर्भातील अमरावतीमध्ये होतं. म्हणून या परिसराला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल जातं. इथला संत्रा देश विदेशात देखील विकला जातो. मात्र सध्या संत्रावर तडक्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. या रोगामुळे संत्राची गळती होतेय. तर संत्राला भेगा पडताहेत.
सद्या स्थितीत या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं 25 ते 30 टक्के नुकसान झालंय. वेळेत कृषी विभागाचं मार्गदर्शन न झाल्यास, संत्राचं जास्त नुकसान होण्याची भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सतावते आहे.
मागील वर्षी टाळेबंदीमुळे संत्राचे भाव घसरले होते. परिणामी बेभाव संत्रा विकावा लागला. यावेळी संत्रावर रोगाचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होत आहे. संत्रा उत्पादकांना गरज आहे ती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची…. कृषी विभाग मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
(tadkya Diseases of orange Crop Amravati Farmer big losses)
हे ही वाचा :
Onion Price: कांद्याच्या भावात अचानक घट, नेमकं कारण काय?
हिम्मत केली, धाडस दाखवलं, नव्या प्रयोगाने मालामाल केलं, तीन महिन्यात फ्लॉवर उत्पादक शेतकरी लखपती!