नवी दिल्ली : देशातील अनेक शेतकऱ्यांना (Farmer) आता सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पीकाचं आतोनात नुकसान झालं आहे. पावसाळ्यात आलेल्या महापूरामुळे खरीप हंगामाचं नुकसान झालंय. तर अवकाळी पावसामुळं रब्बी (rubby season) हंगामाचं नुकसान झालं आहे. सध्या अजून एक संकट शेतकऱ्यांच्यासमोर उभं ठाकलं आहे. पीकांवरती कीड्यांनी हल्ला करायला सुरुवात केली आहे. हा प्रकार देशात सगळीकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. यापासून सुटका कशी करायची यासाठी शेतकरी त्यातील तज्ञांची भेट घेण्यासाठी इतकं-तिकडं धावाधाव करीत आहेत. राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अधिक झाल्यामुळे हा सगळा प्रकार पाहायला मिळत आहे. सध्याच्या कीडीवरती योग्य औषधांची फवारणी गरजेचं असल्याचं शेतकरी म्हणतं आहेत.
देशात चहाच्या पीकाचं अधिक नुकसान होत आहे. कीडींचा सगळ्यात जास्त फटका चहाच्या पीकाला बसला आहे. त्यामुळे चहाचे उत्पादक शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून चिंतेत आहेत. नेमकं काय करावं हे कुणालाचं कळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. एका वेबबाईटने दिलेल्या माहितीनुसार चहाच्या पीकामुळे वर्षाला किमान 14.7 करोड किलो चहाच्या पीकाचं नुकसान होत आहे.
एका संघटनेने जाहीर केले आहे की, सगळ्यात जास्त चहाच्या पीकाचं नुकसान कीडीच्या प्रादुर्भावामुळं झालं आहे. त्यानंतर वातावरणातील बदलामुळं सुध्दा, काहीवेळेला अतिमुसळधार पावसामुळे, या तीन गोष्टीमुळे चहाच्या पीकाचं 2,865 करोड़ रुपयच्या टॅक्सचं सुद्धा नुकसान झालं आहे. आपल्याकडे सध्या ज्या पध्दतीची कीड पीकांना लागत आहे. त्याचपद्धतीची कीड यापुर्वी सुध्दा शेतात दिसत होती. पण आता नुकसान अधिक वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत.
उत्तर भारतात सगळ्यात जास्त चहाच्या पीकांवर प्रमुख कीटकं म्हणजे मच्छर कीड़े, थ्रिप्स, लूपर कैटरपिलर आहेत. तर इतर ठिकाणी दीमक नावाची कीड अधिक पसरली आहे. विशेष म्हणजे इतर पीकांवर सुध्दा या कीडीने अधिक तेजीने हल्ला केला आहे.
कछार, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दार्जिलिंग, तराई, पश्चिम बंगाल इत्यादी भागात कीडींचा प्रमाण अधिक वाढलं आहे. शेतकरी अजूनही तज्ज्ञांचं मत विचारत घेत आहेत. कारण, रोज नुकसान होत असल्यामुळे नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.