PM Kisan : पीएम किसान विषयी मोठी अपडेट, १४ वा हप्ता केव्हा मिळणार?

| Updated on: May 08, 2023 | 5:18 PM

केंद्र सरकार तीन ते चार महिन्यानंतर दोन-दोन हजार रुपये आर्थिक मदत देते. पीएम किसान योजनेची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

PM Kisan : पीएम किसान विषयी मोठी अपडेट, १४ वा हप्ता केव्हा मिळणार?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : देशातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण एक महिन्यानंतर धान शेतीच्या कामाला लागणार आहेत. शेतकऱ्यांना मशागतीसाठी आणि बियाणांसाठी पैशांची गरज पडणार आहे. वेळेवर शेतकऱ्यांनी १४ वा हप्ता मिळाला तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. केंद्र सरकार लवकरच १४ वा हप्ता जारी करू शकते.

मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

पीएम सन्मान निधी योजना एक केंद्र सरकारची योजना आहे. केंद्राच्या एनडीए सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत केंद्रातील भाजपची सरकार दरवर्षी सहा हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देते. केंद्र सरकार तीन ते चार महिन्यानंतर दोन-दोन हजार रुपये आर्थिक मदत देते. पीएम किसान योजनेची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

केव्हा जारी होणार १४ वा हप्ता

आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या १३ हप्ते जारी झाले आहेत. आता १४ वा हप्ता मिळण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला १४ वा हप्ता जारी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्यासाठी खूप वाट पाहावी लागणार नाही. एक महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात पीएम किसानची रक्कम पोहचेल. त्यासाठी पूर्ण कागदपत्र अपटेड करावे लागतील.

हे सुद्धा वाचा

येथे नोंदवता येईल तक्रार

PM kisan.go.in वर जाऊन आपलं नाव तपासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता जारी केला होता. यासाठी केंद्र सरकारने १६ हजार कोटी रुपये खर्च केले होते. ८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी १३ व्या हप्त्याचा फायदा घेतला.

१४ व्या सूचीतील आपलं नाव तपासायचं असेल तर पीएम किसानच्या कार्यालयीन वेबसाईटवर जाऊन आपलं नाव तपासावं. केंद्र सरकारने पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. शेतकरी १५५२६१ किंवा १८००११५५२६ या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकतात.