पपईला वेगळा पर्यांय निवडला मात्र तोही फसला, मग शेतकऱ्याने उभ्या पिकावरच नांगर फिरवला

| Updated on: Nov 25, 2021 | 12:04 PM

पपई पिकावर किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे उत्पादनात घट आणि अधिकचा खर्च यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्याने अरबी कंद भाजीचा प्रयोग केला. मात्र, या पिकाला बाजारात भावच मिळाला नाही. त्यामुळे काढणी वाहतूक हा अधिकचा खर्च न करता शेतकऱ्याने थेट नांगरच फिरवला आहे.

पपईला वेगळा पर्यांय निवडला मात्र तोही फसला, मग शेतकऱ्याने उभ्या पिकावरच नांगर फिरवला
अरबी कंद भाजीला दर नसल्यामुळे या पिकावर नंदुरबार येथील शेतकऱ्याने नांगर फिरवला आहे.
Follow us on

नंदुरबार : उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीक आहे. मात्र, त्याच्या प्रयत्नाला साथ पाहिजे ती निसर्गाची आणि बाजारपेठेतील दराची. मात्र, या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या हाती नसल्याने शेती व्यवसयात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. पपई पिकावर किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे उत्पादनात घट आणि अधिकचा खर्च यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्याने अरबी कंद भाजीचा प्रयोग केला. मात्र, या पिकाला बाजारात भावच मिळाला नाही. त्यामुळे काढणी वाहतूक हा अधिकचा खर्च न करता शेतकऱ्याने थेट नांगरच फिरवला आहे.

शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होत आहेत. मात्र, या बदलाबरोबरच शेतकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत असतानाच बाजारपेठेतील दर किंवा वातावरणातील बदल यामुळे अधिकचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील राजू पाटील यांनी यंदा 11 एक्कर क्षेत्रामध्ये कंदभाजी असलेल्या अरबीची लागवड केली होती. पण बाजारात दरच नसल्याने त्यांनी उभ्या पिकात नांगर फिरवला आहे. त्यामुळे पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

11 एकरामध्ये केली होती लागवड

ब्राह्मणपुरी येथील राजू पाटील हे दरवर्षी पपई पिक घेतात. पण या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने यंदा प्रथमच त्यांनी अरबी कंदभाजीचा प्रयोग केला होता. उत्तर भारतामधून 18 रुपये किंलोप्रमाणे बियाणे खरेदी करुन तब्बल 11 एकरामध्ये त्यांनी लागवड केली होती. लागवडीपासून काढणीच्या टप्प्यांपर्यंत त्यांना 6 लाख रुपये खर्च आला होता. मात्र, बाजारपेठेत या अरबी कंदभाजीला दरच नाही. त्यामुळे पाटील यांचा खर्च आणि वेळही वाया गेलेला आहे. मागणी नसल्याने ही अवस्था झाली आहे. त्यामुळे काढणी आणि माल वाहतूकीचा खर्चही परवडत नसल्याने त्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे.

2 रुपये किलोचा भाव अन् 5 रुपये काढणीचा खर्च

नव्याने लागवड केलेल्या अरबी कंदभाजीपासून शेतकरी राजू पाटील यांना उत्पादनाची मोठी आशा होती. मात्र, पिकाची योग्य जोपासना केल्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात लागले होते. मात्र, बाजारात या भाजीला 2 रुपये किलोचा दर तर काढणीला 5 रुपये खर्ची करावे लागत होते. त्यामुळे काढणी न करताच त्यांनी या पिकावर नांगर फिरवला आहे. पदरून खर्च करुन बाजारपेठेत दाखल करण्यापेक्षा अरबी कंद भाजीची मोडणी करुन आता रब्बी हंगामातील पिक घेणार असल्याचे पाटील यांनीच सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या नवनविन प्रयोगाला अडसर

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने राजू पाटील यांनी 11 एकरावरील क्षेत्रावर हा प्रयोग केला होता. एका एकराला 7 क्विंटल बियाणे ते ही 18 रुपये किलोने उत्तर भारतामधून आणले होते. शिवाय लागवडीचा आणि पिक जोपासण्याचा खर्च हा वेगळाच. असे असतानाही काढणीच्या दरम्यान पाटील यांनी बाजारभावाची चौकशी केली तर या पिकाला केवळ 2 रुपये किलो असा दर होता. त्यामुळे काढणीही पदरुनच करावी लागत असल्याने त्यांनी थेट नांगर फिरवला आहे. आता रब्बी हंगामातील पेरण्या सुरु आहेत. या मोकळ्या केलेल्या क्षेत्रावर आता हरभरा लागवडीचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दर आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पुन्हा शेतकरी हा पारंपारिक पिकाकडेच वळत आहे.

संबंधित बातम्या :

आतापर्यंत घडले नाही ते घडतंय यंदाच्या रब्बी हंगामात, मग कशाला भासतेय पाण्याची टंचाई?

ठिबक सिंचनास वाढीव अनुदान म्हणजे, पुढचे पाठ.. मागचे सपाट ; काय आहे नेमका प्रकार?

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : बासमतीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा