नंदुरबार : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. यावर्षी मिरची खरेदीचा नवीन विक्रम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या महिन्याभराच्या कालावधीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 60 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. शिवाय दरही माफक मिळत असल्याने राज्यासह लगतच्या गुजरात राज्यातील शेतकरीही हीच बाजारपेठ जवळ करीत आहे.
लाल मिरची खरेदीला सुरवात होताच दरही माफक मिळालेला आहे. त्यामुळे आवक कायम वाढत आहे. असे असतानाच दोन दिवसांपूर्वी मिरचीचे लिलाव हे बंद होते. ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज वर्तवल्याने समिती प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. पण आता व्यवहार सुरु झाले असून लाल मिरचीची आवक वाढत आहे.
वातावरणातील बदलामुळे लाल मिरचीच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. मात्र, खरेदीला सुरवात होताच शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे असतो. शिवाय दरही माफक प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील तसेच परराज्यातील शेतकऱ्यांमुळे तब्बल 60 हजार क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे. खानदेश तसेच नंदुरबारच्या सीमेलगत असलेल्या गुजरातमधूनही शेतकरी मिरची विक्रीसाठी दाखल होत आहेत. अशी आवक राहिली तर यंदा विक्रमी आवकची नोंद होईल असा विश्वास बाजार समितीच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लाल मिरचीचे व्यवहार हे बंद होते. त्यामुळे आता लाल मिरचीची आवक ही वाढली आहे. मात्र, याचा दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. शिवाय मिरचीचा दर्जा कायम रहावा म्हणून बाजार समितीच्या परिसरातील पठरांवरच वाळवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या भागात लाली पसरलेली आहे.
आता मिरचीची आवक होण्यास सुरवात झाली आहे. शिवाय चांगल्या दर्जाचा माल अजूनही बाजारपेठेत आलेला नाही. मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी मागणीही त्याच प्रमाणात असते. शिवाय मिरचीसाठी हा भाग सुपिक मानला जातो. गतवर्षी 2 हजारापासून ते 3 हजार 500 रुपये क्विंटलला दर मिळालेला होता. यंदाही त्यापेक्षा अधिकचा दर मिळेल अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने व्यक्त करण्याात आला आहे. सध्या 1 हजार 500 ते 3 हजाराचा तर मिळत आहे.
लाल मिरचीसाठी यंदा पोषक वातावरण राहिलेले आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. आतापर्यंत केवळ 40 टक्के क्षेत्रावरील मिरची बाजारात दाखल झालेली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीतच 60 हजार क्विंटल आवक झाली असून आता उर्वरीत 60 टक्के क्षेत्रावरील मिरचीची आवक झाली तर यंदा विक्रमी आवक होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले आहे.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम, फळबागांचे असे करा व्यवस्थापन
ठरलं तर मग, आता बाजार समित्यांमध्ये 50 किलो वजनाचीच गोणी, प्रशासन अन् संघटनांच्या बैठकीत निर्णय
कांदा बिजोत्पातदन पध्दती, उत्पादन वाढविण्यासाठी महत्वाची प्रक्रिया