नवी दिल्ली: केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Act) पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. तर, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे 41 प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेली चर्चा फिस्कटली आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये पुढील चर्चा 15 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बैठकीत सरकारपुढे ‘लॉ वापसी’ नंतरच घर वापसी अशी भूमिका मांडली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मात्र देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांचं स्वागत केलं असल्याचे सांगितले. (The eighth round between Farmer Unions and Center was fail next meet on 15 January )
सरकारसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कायदे रद्द करावेत अशी मागणी केली. कायदे रद्द करण्याशिवाय आम्हाला दुसरे काही नको, अशी भूमिका मांडली. कायदे रद्द करण्यासाठी आम्ही कोणत्याही न्यायालयात जाणार नाही. आम्ही आमचा लढा सुरु ठेऊ, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. 26 जानेवारील आम्ही परेड करण्याचं नियोजन केले, असल्याचं ऑल इंडिया किसान सभेचे जनरल सेक्रेटरी हनान मोल्लाह यांनी सांगितले.
आठव्या फेरीतील चर्चेत केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी संघटनांचे 41 प्रतिनिधी सहभागी झाले होते. शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले. शेतकऱ्यांनी सरकारनं लॉ वापसी केल्याशिवाय घर वापसी करणार नसल्याचे सांगितले. तर, केंद्र सरकारच्यावतीनं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशातील विविध भागातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचं स्वागत केलं आहे. तर, शेतकऱ्यांनी देशहिताचा विचार करावा, अशी भूमिका तोमर यांनी घेतली.
विज्ञान भवनात शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी प्रतनिधी आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीपूर्वी नरेंद्र सिंह तोमर यांनी चर्चेतून तोडगा निघेल, असं सांगितलं होते.
पुढील बैठक 15 जानेवारीला
शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत 8 वेळा चर्चा झाली आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुढील बैठक 15 जानेवारील होण्याची शक्यता आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 44 वा दिवस आहे.
संबंधित बातम्या:
LIVE : तुम्ही तुमचं जेवण करा, आम्ही आमचं जेवून घेऊ; मंत्र्यांसोबत जेवण्यास शेतकऱ्यांचा नकार
अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी
(The eighth round of meeting between Farmer Unions and Center was fail next meet on 15 January )