Crop Change : मांजरा पट्ट्यात ऊस नव्हे तर सोयाबीन बहरतंय, नगदी पिकाला डावलून कडधान्यावर भर

| Updated on: Mar 24, 2022 | 6:23 AM

मुबलक पाणी, दर्जेदार शेतजमिन आणि लगतच साखर कारखाना म्हणलं की ऊसाचे पीक हे ठरलेलेच आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर आता मराठवाड्यातही क्षेत्र वाढत आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ऊस गाळपाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यातील हीच अडचण लक्षात घेऊन पुढच्यावा ठेस मागचा शहाणा याप्रमाणे मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी निर्णय घेतला.

Crop Change : मांजरा पट्ट्यात ऊस नव्हे तर सोयाबीन बहरतंय, नगदी पिकाला डावलून कडधान्यावर भर
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेत
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उस्मानाबाद : मुबलक पाणी, दर्जेदार शेतजमिन आणि लगतच (Sugar Factory) साखर कारखाना म्हणलं की ऊसाचे पीक हे ठरलेलेच आहे. ऊस हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक आहे. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर आता मराठवाड्यातही क्षेत्र वाढत आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ऊस गाळपाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यातील हीच अडचण लक्षात घेऊन पुढच्यावा ठेस मागचा शहाणा याप्रमाणे मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. गतवर्षी पासूनच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. भविष्यातील हाच धोका लक्षात मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊसाला डावलून थेट (Soybean Crop) सोयाबीन पेऱ्यालाच महत्व दिले आहे. ऊस क्षेत्रात वाढ झाल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापेक्षा आगामी वर्षात बिकट परस्थिती निर्माण होणार असल्याने शेतकरी इतर मार्गाचा अवलंब करीत आहे.

सोयाबीनला वाढता भाव अन् पोषक वातावरणही

गतवर्षीपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय यंदा मुबलक पाणी आणि पोषक वातावरण यामुळे उन्हाळी सोयाबीनवरच शेतकऱ्यांनी भर दिला आहे. ऊसतोड झाली की खोडव्याच्या माध्यमातून ऊसाचे पीक न घेता थेट कडधान्यावर भर दिला जात आहे. तीन महिन्यात सोयाबीनचे उत्पादन घेऊन पुन्हा इतप पिकांसाठी क्षेत्र रिकामे राहते यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाला डावलून थेट सोयाबीनचा पेरा केला आहे.

अतिरिक्त ऊसामुळे शेतकरी मेटाकूटीला

ऊसाचा कालावधी पूर्ण होऊन देखील ऊस फडातच आहे. त्यामुळे उत्पादनात घट शिवाय ऊसतोडीसाठी करावी लागणार कसरत ही वेगळीच. शिवाय अधिकचा पैसा खर्ची करुनही ऊसतोड ही झालेलीच नाही. आता ऊसाला 15 महिने उलटले आहेत. त्यामुळे ऊसतोड झाली तरी शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. यंदाची झालेली बिकट अवस्था पाहून मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी खोडव्याचे उत्पादन न घेता ऊस मोडून थेट सोयाबीनचा पेरा केला आहे.

ऊस उत्पादनात वाढत्या अडचणी

ऊसाचे उत्पादन घेणे सोपे असले तरी त्याची तोड आणि वेळेत गाळप या गोष्टींची समस्या कायम आहे. गेल्या दोन वर्षापासून ऊसाच्या उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आहे. पण साखर कारखान्यांचे नियोजन आणि ऊसतोडीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ऊसासारखे पीकही धोक्यात आहे. त्यामुळे पाणी, योग्य शेतजमिन असली की लागलीच ऊसाची लागवड हे चित्र लोप पावत आहे. त्यामुळे ऊस लागवडीपासून गाळपापर्यंत योग्य नियोजन असलेच तरच पीक पदरात पडणार आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : कांदा विक्री नंतरही मोबदला नाही, Solapur मध्ये 9 व्यापाऱ्यांवर कारवाई

केंद्र सरकारच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, यंदाच्या हंगामापासून Zero Budget शेतीचा प्रयोग

Kokan Farmer : आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ‘वाली’ कोण? ना नुकसानीचे पंचनामे ना कोणती मदत?